Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा फक्त एका क्लिक वर. 

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

राज्य विधीमंडळाचं आजपासून मुंबईत विशेष अधिवेशन असणार आहे. आजपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन असणार आहे. 7, 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी असणार आहे. सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 9 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचं अभिभाषण असणार आहे. त्यानंतर 9 डिसेंबरलाच नागपूरमध्ये होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाईल. 

7 Dec 2024, 08:37 वाजता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्सनं जप्त केलेली मालमत्ता मुक्त होणार आहे. अमोल मिटकरींकडून निर्णयाचं स्वागत करण्यात आली आहे. तर सुषमा अंधारेंची भाजपवर टीका केली आहे. 

7 Dec 2024, 07:44 वाजता

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालं असून नाशिकच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकरराव पिचड यांच्यांवर ब्रेन हॅमरेजमुळं रुग्णालयात उपचार सुरु होते. दीड महिन्यांपासून सुरु घेतलेल्या पिचडांचे शुक्रवारी निधन झाले. आज शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. 

7 Dec 2024, 07:28 वाजता

दिल्ली ट्रिब्युनलच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी स्वागत केलं आहे. सत्याचा विजय होतो असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

7 Dec 2024, 07:28 वाजता

दिल्ली ट्रिब्युनलच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी स्वागत केलं आहे. सत्याचा विजय होतो असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

7 Dec 2024, 07:27 वाजता

महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक

महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक असणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महायुतीच्या प्रमुख नेते राहणार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

7 Dec 2024, 07:26 वाजता

 ठाणे, भिवंडीतील 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. पिसे इथल्या 'न्यूमॅटिक गेट सिस्टीम'मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे.