Breaking News LIVE Updates:जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Maharashtra Breaking News LIVE Updates: आज वर्षाचा शेवटचा दिवस... सगळीकडेच नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरु असतानाच दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊयात...

Breaking News LIVE Updates:जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

31 Dec 2024, 18:42 वाजता

जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मंगळवारी पार पडली असून यात जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवली जावी असे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आली आहे. विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डिबीटी प्रणालीद्वारे वितरित करा,  वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करा असे  निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  पुढील १०० दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाने करावयाच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. 

31 Dec 2024, 18:41 वाजता

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर आणि प्रशासन सज्ज

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून संपूर्ण मुंबईत 12048 पोलीस कर्मचारी तैनात असणार असून यात 2400 महिला पोलिसांचा समावेश आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या टीमही तयार आहे. थर्टी फर्स्ट नाईट लाईफ मध्ये हॉटेलमध्ये अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी हॉटेल व्यवसायिकांनी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. 

31 Dec 2024, 17:22 वाजता

बीडच्या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस 

बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड याने मंगळवारी पोलिसांसमोर सरेंडर केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही असे म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 'ज्या ज्या प्रकरणात कुणी आढळेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. तपास गतिशील करण्यात आलेला आहे आणि त्यामुळंच त्यांना शरणागती पत्करावी लागलीय. जे आरोपी फरार त्यांना पकडायलाही टीम बनवली आहे.सर्वांना शोधून काढू'.

31 Dec 2024, 16:55 वाजता

बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीला शरण आलाय.. त्याची पुणे सीआयडी कार्यालयात चौकशी केल्यानंतर सीआयडीचे अधिकारी वाल्मिकला घेऊन केजकडे रवाना झालेत. वाल्मिकला आजच सीआयडी केज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे..

31 Dec 2024, 15:59 वाजता

जगात सर्वात प्रथम न्यूझीलंडमध्ये नववर्षाचा जल्लोष

भारतात नवीन वर्षाचं आगमन होण्यासाठी अजून 7 ते 8 तास बाकी असताना न्यूझीलंडमध्ये नववर्षाला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडच्या प्रमाणवेळेनुसार तेथे 12 वाजून गेले असल्याने तेथे नववर्षाचा जल्लोष केला जात आहे. 

31 Dec 2024, 14:59 वाजता

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला माजी राष्ट्रपती रामनाथ कोवींद त्रिंबकेश्र्वराच्या चरणी 

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला माजी राष्ट्रपती रामनाथ कोवींद दर्शनासाठी त्रिंबकेश्र्वराच्या चरणी पोहोचले असून येथे मंदिरात ते विधिवत पूजा करणार आहेत. विश्वस्त मंडळासह पोलिसांकडून कोविंद यांच्या दर्शनासाठी खास नियोजन करण्यात आले असून शिर्डी येथे साई मंदिरातील दर्शनानंतर कोविंद त्र्यंबक नगरीत दाखल होणार आहेत. 

31 Dec 2024, 14:54 वाजता

CID कडून वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात 

CID चे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात केली आहे.  CID कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात वाल्मीक कराड याची चौकशी केली जात असून 12 वाजून 5 मिनिटांनी वाल्मीक कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात दाखल झाला. त्याने पोलिसांसमोर सरेंडर केले. 

31 Dec 2024, 13:31 वाजता

वाल्मिकी कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती

पुण्यामध्ये सीबीआयला शरण आल्यानंतर वाल्मिकी कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. नातेवाईकांनी वाल्मिकीला काही औषधं दिली आहेत. 

31 Dec 2024, 13:08 वाजता

वाल्मिक कराडच्या अटकेनंतरही मस्साजोगचे गावकरी असमाधानी

वाल्मिक कराडच्या अटकेनंतर ही मस्साजोगचे  गावकरी असमाधानी आहेत. सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी उद्या गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन करणार आहेत. वाल्मिक कराडची अटक म्हणजे नौटंकी असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी नोंदवली आहे.

31 Dec 2024, 12:30 वाजता

वाल्मिक कराड शरण आला

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेले अजित पवारांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण आला आहे. याच प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मागील काही दिवसांपासून फरार होता. त्याने एक व्हिडीओ प्रदर्शित करुन आपण शरण येत असल्याची घोषणा केली. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...