Maharashtra Breaking News LIVE : नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपमध्ये धुसफूस

Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  आजच्या दिवसभरात राज्यात नेमकं काय घडतंय पाहा एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE : नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपमध्ये धुसफूस

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणूकीच्या धरतीवर राज्यात नेमकं काय होणार. पुढे काय पाहायला मिळणार. त्यासोबत इतर विषयांवर सविस्तर माहिती. आचारसंहिता काळात घेतलेल्या निर्णयांचे पडसाद कसे पाहायला मिळणार हे जाणून घेणं लक्षवेधी ठरणार आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई गँगनं उघडपणे धमकी दिली आहे. दरम्यान, या सगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी पाहा LIVE UPDATES... 

18 Oct 2024, 13:17 वाजता

नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपमध्ये धुसफूस 

नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपमध्ये धुसफूस वाढलीये. सीमा हिरेंना उमेदवारी न देण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केलीय. त्यांच्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ते करतायेत. दरम्यान उमेदवार बदलासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटलेत.

18 Oct 2024, 12:41 वाजता

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात प्रभाकर पाटील विरुद्ध रोहित पाटील सामना रंगणार! 

सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात प्रभाकर पाटील विरुद्ध रोहित पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण या मतदार संघातून भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील निवडणुकीच्या मैदनात उतरणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार,अशी लढत होण्याची शक्यता आहे. 

18 Oct 2024, 11:55 वाजता

आदिती तटकरेंना श्रीवर्धन मतदारसंघातून आव्हान 

आदिती तटकरेंना श्रीवर्धन मतदारसंघातून आव्हान मिळालं. तर ज्ञानदेव पवार हाती तुतारी घेणार. 
त्यामुळे आदिती तटकरें विरोधाच ज्ञानदेव पवार उभे राहणार आहेत. ज्ञानदेव पवार हे आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं होणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ज्ञानदेव पवार हे आदिती तटकरे यांच्या विरोधात श्रीवर्धनमधून लढण्याची शक्यता आहे. जागा वाटपात श्रीवर्धन मतदार संघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार. 

कोण आहेत ज्ञानदेव पवार? 

ज्ञानदेव पवार माणगावचे शिवसेना नेते होते. इतकंच नाही तर ते माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष देखील होते. ज्ञानदेव पवारांची ओळख ही कुणबी चेहरा अशी आहे. 

18 Oct 2024, 11:50 वाजता

जागावाटप आधीच उद्धव ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप?

येत्या 2 ते 3 दिवसांत शिवसेना UBT पक्ष विद्यमान आमदारांना एबी फॉर्म मिळणार आहेत. काल बैठकीला बोलवलेल्या विद्यमान आमदारांनी तात्काळ एबी फॉर्म न घेता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म घेणार असल्याचं सांगितले. त्यामुळे काल एबी फॉर्म दिले गेले नाहीत. उद्धव ठाकरे आजारी असल्याने दोन ते तीन दिवसांनी पुन्हा आमदारांना बोलवून एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरे आपल्या पक्षातल्या उमेदवारांना AB फॉर्म देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

18 Oct 2024, 10:45 वाजता

ठाकरेंच्या शिवसेनेची संभाव्य उमेदवार यादी समोर

काल मातोश्रीवर उपस्थित असलेल्या 13 विद्यमान आमदारांची उमेदवारांची तसंच आणखी 6 जणांची उमेदवारी निश्चित मानली जातंय. पहिल्या टप्प्यात शिवसेना ठाकरे गटाच्या 19 जणांची उमेदवारी निश्चित झालीय. तर 3 विद्यमान आमदारांना या बैठकीचे निमंत्रण दिले गेले नसल्याची माहिती मिळतं. त्यामुळं त्यांची उमेदवारी थोडी अनिश्चित मानली जातंय. 

या तीन विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात?

1. अजय चौधरी,शिवडी
2. उदयसिंग राजपूत,कन्नड,संभाजीनगर
3. प्रकाश फातर्पेकर,चेंबूर

कोणत्या आमदारांची उमेदवारी निश्चित?

1. आदित्य ठाकरे,वरळी
2. सुनील प्रभू,दिंडोशी
3. रमेश कोरगांवकर,भांडूप
4. सुनील राऊत,विक्रोळी
5. राजन साळवी,राजापूर
6. ऋतुजा लटके,अंधेरी पूर्व 
7. संजय पोतनीस,कलिना
8. कैलास पाटील,धाराशीव
9. भास्कर जाधव,गुहागर
10. शंकरराव गडाख,नेवासा
11. वैभव नाईक,कुडाळ
12. नितीन देशमुख,बाळापूर(अकोला)
13. राहुल पाटील,परभणी

या आमदारांची उमेदवारी जवळपास निश्चित (काल मातोश्रीवर होते)

1. स्नेहल जगताप - महाड मतदारसंघ

2. सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम

3. अद्वय हिरे - मालेगाव बाह्य 

4. नितीन सावंत - कर्जत मतदारसंघ

5. अनिल कदम - निफाड
 
6. मनोहर भोईर-उरण

18 Oct 2024, 10:41 वाजता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाडायचं- बच्चू कडू

महायुतीतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाडायचं असल्याचा थेट इशारा बच्चू कडूंनी दिलायय. तसेच मविआतील नेत्यांनाही पाडायचं असल्याचंही कडू म्हणालेत. 4 नोव्हेंबरला महाशक्ती मोठा स्फोट करणार असल्याचंही कडू म्हणालेत, माझ्या मतदारससंघातील लोकांच्या माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे मी त्याच मतदारसंघातून लढणार असल्याचं कडू म्हणालेत. नागपुरात आले असता त्यांनी महायुती आणि मविआवर टीका केलीय. 

18 Oct 2024, 10:15 वाजता

'लढा माझ्या शेतकऱ्याचा' व्याहाड ते मोवाड यात्रेत अनिल देशमुख आणि सलील देशमुख सहभागी

सलील देशमुख यांची काटोल विधानसभा मतदारसंघात  व्याहाड ते मोवाड यात्रा सुरू झालीये. सरकारच्या शेती संबंधात चुकीच धोरण,  महागाई, सर्वसामान्य  प्रश्नांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं व्याहाड ते मोवाड 'लढा माझ्या शेतकऱ्याचा' यात्रा काढण्यात येतेय. यात्रेचा हा पहिला टप्पा व्याहाड ते मोवाड असून 6 दिवसात 70 गावात ही यात्रा जाणार आहे. ज्या गावात ही यात्रा संपणार त्याच गावात यात्रेचा मुक्काम राहणार आहे. यात चावडी बैठका घेवून नागरीकांशी संवाद सुध्दा साधण्यात येणार आहे. या यात्रेच्या  माध्यमातून अनिल आणि सलील देशमुख काटोल विधानसभा मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचणार आहे HOLD FOR 121 थेट या यात्रेतून अनिल देशमुखांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी.. 

18 Oct 2024, 10:13 वाजता

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरु

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या आणखी 250 पदाधिकाऱ्यांनी काल राजीनामे दिलेत. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी ही कायम आहे.