Kidney Stones च्या रुग्णांनी 'हे' 5 पदार्थ खाण्याचा स्वप्नातही विचार करु नका, अन्यथा...!

Kidney Stones:  मुतखड्याचा त्रास झालेल्यांनी काय काळजी घ्यायला हवी? नेहमीच्या आहारात कोणता बदल करायला हवा?

Pravin Dabholkar | Updated: Oct 17, 2024, 04:31 PM IST
Kidney Stones च्या रुग्णांनी 'हे' 5 पदार्थ खाण्याचा स्वप्नातही विचार करु नका, अन्यथा...! title=
किडनी स्टोन

Kidney Stones: तुम्ही कधी किडनी स्टोन झालेल्यांचा अनुभव ऐकला असाल तर तो फारच धडकी भरवणारा असतो. किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. एखाद्या दुश्मनालाही त्रास होऊ नये इतक्या वेदना यात होतात, असा अनुभव रुग्ण सांगतात. हा त्रासापर्यंत आपण कसे पोहोचतो? मुतखड्याचा त्रास झालाय, त्यांनी काय काळजी घ्यायला हवी? नेहमीच्या आहारात कोणता बदल करायला हवा? कोणते पदार्थ टाळायला हवेयत? सर्वकाही जाणून घेऊया. 

आपल्या चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींसोबतच आपली कमी पाणी पिण्याची सवयदेखील किडनी स्टोन होण्याचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. किडनी स्टोन झाला असल्यास तुम्ही आहाराची काळजी घेतली तरी तुमच्या समस्या बऱ्याच अंशी सुटू शकतात. किडनी स्टोन झाल्यास कोणत्या गोष्टी सोडाव्या लागतात? जाणून घेऊया. स्टोनच्या रुग्णांनी पुढील गोष्टी टाळाव्यात. अन्यथा तुमचे आजारपण वाढू शकते. 

सीफूड आणि मांस

तुम्हाला सी फूड आणि मांस खाणे आवड असेल. तुम्ही प्रत्येक वाराला न चुकता हे खात असाल. पण तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर ते तुम्ही वेळीच सोडले पाहिजे. यासोबतच तुम्हाला प्रथिनयुक्त पदार्थदेखील टाळावे लागतील. या पदार्थामध्ये प्युरीन नावाचे घटक आढळतात. स्टोनच्या रुग्णाच्या शरीरात प्युरीनचे प्रमाण वाढले तर शरीरात यूरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. ज्यामुळे स्टोनचा आकारही वाढू शकतो.

पालक

जर तुमच्या किडनीत स्टोन असतील तर पालकापासून दूर राहणे चांगले. पालकसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये ऑक्सलेट आढळते. पालक खाल्ल्याने ते कॅल्शियम गोळा करते आणि ते लघवीपर्यंत पोहोचू देत नाही. जर तुम्हाला स्टोन असेल आणि तुम्ही पालक खात असाल तर तुमची प्रकृती बिघडू शकते.

टोमॅटो

टोमॅटोमध्येही ऑक्सलेटचे प्रमाणही भरपूर असते. किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी टोमॅटोचे सेवन अजिबात करू नये. तुम्ही टॉमेटो खात असाल तरी त्याच्या बिया नक्कीच काढा.

चॉकलेट

तुम्हाला चॉकलेट कितीही आवडत असले तरी स्टोन असल्यास चॉकलेटला नाही म्हणावेच लागेल. मुतखडा असेल तर डॉक्टर तुम्हाला चॉकलेट सोडून देण्याचा सल्ला देतात. चॉकलेटमध्ये ऑक्सलेट्स असल्यामुळे स्टोनची समस्या वाढू शकते.

चहा

स्टोनचा त्रास आहे, हे कळाल्यापासूनच चहा न पिण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा रुग्णाला खूप त्रास होऊ शकतो. चहामुळे स्टोनचा आकार वाढू शकतो.

किडनी स्टोन झालेल्यांनी ही घ्या काळजी 

किडनी स्टोनचे रुग्ण असाल तर पचायला जास्त वेळ जाईल अशा पदार्थांचा जेवणात समावेश करू नका.मांस, मासे, कोल्ड्रिंक्स इत्यादींचे पदार्थांचा विचार करणेही सोडून द्या. फळांमध्ये, स्ट्रॉबेरी आणि प्लम्स तसेच अंजीर आणि मनुका यांसारख्या सुक्या फळांचे सेवन टाळा.दही, चीज आणि लोणी अशा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करा.
कॅन केलेला सूप, नूडल्स, तळलेले पदार्थ, जंक फूड इत्यादी टाळा. वांगी, मशरूम आणि फ्लॉवर सारख्या भाज्या टाळाव्यात, यामुळे स्टोनचा त्रास वाढू शकतो.