नागपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ३६.७२ टक्के मतदान नोंदवण्यात आलंय.
- पुरूष - ४,३३,९४२ (३९.५८ टक्के)
- महिला - ३,५९,३३४ (३३.७८ टक्के)
- इतर - ३ (३.९० टक्के)
- एकूण मतदान - ७,९३,२७९ (३६.७२ टक्के)
तसंच दुपारी ३ वाजेपर्यंत रामटेक ४५ टक्के, भंडारा-गोंदिया ४७ टक्के मतदानाची नोंद झाली
दुपारी १ वाजेपर्यंत नागपूर २७.४७ टक्के, रामटेक २३.१९ टक्के, गडचिरोलीत ४३.४३ टक्के, यवतमाळ वाशिम २६.०९ मतदानाची नोंद झालीय.
विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाडाबाबत ३९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. काँग्रेसच्या वॉर रुमने निवडणूक आयोगाकडे याबाबत ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. वर्धा-६, रामटेक-५, नागपूर-१२, यवतमाळ-वाशिम-४, चंद्रपूर-८ आणि गडचिरोली-४ ईव्हीएम तक्रारी दाखल झालेल्या आहे.
यवतमाळ : यवतमाळच्या काही मतदान केंद्रांवर सकाळी मतदान यंत्रात बिघाड असल्यानं मतदान प्रक्रिया सुरू होण्यासाठी विलंब झालां. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद झाल्या होत्या त्या ठिकाणी मतदानची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी यवतमाळ वाशीमच्या युतीच्या उमेदवार आणि खासदार भावना गवळी यांनी केली. तसच माझा विजय निश्चित आहे, लोकांनी भरभरून मतदान करावं, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
गडचिरोली : विदर्भात सात मतदार संघात मतदान सुरू आहे. मात्र नक्षलवाद्यांची धमकी झुगारून गडचिरोलीत आत्तापर्यंत सर्वाधिक मतदान झालंय. गडचिरोलीत तब्बल १८.०१ टक्के मतदान झालंय. गडचिरोलीत मतदान प्रक्रियाच उधळण्याची धमकी नक्षल्यांनी दिलीय. दोन ठिकाणी मतदान सुरू असताना नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोटही केलेत. तरीही मतदारांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. संपूर्ण विदर्भात सर्वाधिक मतदान गडचिरोलीत होतंय. अगदी दुर्गम भागातही मतदार मतदान करत आहेत. तर याच्या उलट स्थिती वर्धा, रामटेक, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळमध्ये आहे. नागपुरात १७.५६ टक्के मतदान झालंय.
चंद्रपूर : कुष्ठरोग्यांचे सेवाधाम असलेल्या 'आनंदवन' येथेही ही कुष्ठरोगी मतदारांनी रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला. आनंदवनचे विश्वस्त डॉक्टर विकास आमटे यांनी स्थानिक जिल्हा परिषद शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांनी बाहेर पडून मतदान नक्की करावे असे आवाहन त्यांनी केले. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सोहळ्यातली आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी, चंद्रपूरवासीय सज्ज झाले आहेत. रणरणत्या उन्हातही चंद्रपूरमधल्या विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारे नव मतदार, तसंच वृद्धही आवर्जून आपलं मतदाराचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदानकेंद्रांवर जात आहेत. भाजपाचे हंसराज अहिर आणि काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्यात चंद्रपूरमध्ये मुख्य लढत आहे.
नागपूर : सिंधी हिंदी पाठशाला या मतदान केंद्रावर खापेकर कुटुंबातल्या चक्क चार पिढ्या मतदानासाठी दाखल झाल्या होत्या. खापेकार घनश्याम (१०५ वर्षे), चिंतामण खापेकर (७८ वर्ष), अनिल खापेकर (४६ वर्ष) आणि विक्रांत खापेकर (१९ वर्ष) यांचाही त्यात समावेश होता.
भंडारा : लाखादूर तालुक्यातील इंदोरा या गावातील पितांबर जेंगठे यांनी आपल्या लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला.
नागपूर : नागपूरचे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी सहकुटुंब मतदान केलं... नागपूरच्या श्रद्धानंद पेठ येथील श्रद्धानंद अनाथालय मतदान केंद्रावर त्यांचं मतदान केलं. ईव्हीएम मशिन्स मध्ये बिघाड होत असल्याने निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली... माझ्या संपूर्ण कुटुंबाने नागपुरात मतदान केलं आहे त्यामुळे मी बाहेरचा कसा ? असाही टोला यावेळी पटोलेंनी मारला.
रामटेक : शिवसेना खासदार आणि रामटेक मधून विद्यमान उमेदवार कृपाल तुमाने यांनी मतदानाचा हक्क बजावला. उन्हाची तमा न बाळगता लोकशाहीच्या या सणाला बाहेर निघा, मतदान करा... उन्हात सण साजरे करता मग मतदान ही करा...तुमाने यांनी जनतेला आवाहन केलं. तर खासदार विकास महात्मे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत डॉ महात्मे यांनी सायकलवर येऊन मतदान केलं. आरोग्य आणि पर्यावरणासाठी सायकल हाच एकमेव चांगला उपाय आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभेतील भाजपाचे उमेदवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शहरातील मराठी सिटी शाळेत मतदानाला येण्यापूर्वी शहराचे कुलदैवत असलेल्या माता महाकालीचे दर्शन घेतले. आजपासून या देवीच्या नवरात्रीलाही प्रारंभ होत आहे. अहिर यांनी मंदिरातील आरतीत सहभागी होत आशीर्वाद मागितले. महाकाली मातेप्रती आपली श्रद्धा असून महाकाली माता आपल्याला निश्चितच जिंकून देईल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यवतमाळ : मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. लोकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केलं.
वर्धा : वर्ध्यात भाजपा उमेदवार रामदास तडस यांनी देवलीच्या यशवंत हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. वर्ध्याच्या नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावं असं आवाहन रामदास तडस यांनी केलंय.
नागपूर : दुपारी सव्वा बारा वाजल्याच्या दरम्यान धरमपेठमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि आपल्या आईसह मतदान केंद्रावर हजेरी लावली. यावेळी, 'गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची पावती मिळतेय. नक्कीच आमचे उमेदवार नितीन गडकरी निवडून येणार... नागपूरसाठी गडकरी यांनी भरभरून काम केलंय' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या आई सरिता फडणवीस यांनी दिलीय.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. सकाळी ७ ते ११ या कालावधीत सरासरी १३.७५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघापैंकी वर्धा १५.७६ टक्के, रामटेक ९.८२ टक्के, नागपूर १७.५६ टक्के, भंडारा-गोंदिया १२.२ टक्के, गडचिरोली-चिमूर १८.०१ टक्के, चंद्रपूर १०.८६ टक्के आणि यवतमाळ-वाशिम १२.०६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
भंडारा : शहरातील जिजामाता प्रायमरी शाळा बुथ क्रमांक ११४ येथील व्ही व्ही पॅट मशीन अचानक पडलं बंद
गोंदिया : रामनगर इथल्या मतदान केंद्र क्रमांक २८१ मधील कंट्रोल यूनिटमध्ये बिघाड झाल्यानं गेल्या १५ मिनिटांपासून मतदान थांबले
नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सपत्निक मतदानासाठी हजेरी लागली.
Maharashtra: Union Minister Nitin Gadkari cast his vote at polling booth number 220 in Nagpur parliamentary constituency #LokSabhaElections2019 pic.twitter.com/hSrlIySwUV
— ANI (@ANI) April 11, 2019
नागपूर : जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती सकाळी ९.०० वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात ११ टक्के मतदान नोंदवण्यात आलं. तर भंडारा-गोंदियामध्ये ७ टक्के, चंद्रपूरमध्ये ९.५ टक्के, यवतमाळ-वाशिममध्ये ६.३१ टक्के, गडचिरोलीत ८.५० टक्के, रामटेकमध्ये ९ टक्के मतदान पार पडलं.
गडचिरोली : महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवर मतदारांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यातील एका मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी आईडीचा स्फोट घडवून आणलाय. नारायणपूर जिल्हा हा गडचिरोलीतील भामरागड सीमेला लागून असलेला जिल्हा आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. केवळ दहशत पसरवण्यासाठीच हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा सुरक्षा यंत्रणेचा अंदाज आहे. तसंच छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर मतदानावर बहिष्कार टाकण्याचे बॅनरही लावण्यात आलेले दिसले.
गडचिरोली : गडचिरोलीतील ज्या भागात कुठलाही पक्ष अथवा उमेदवार प्रचारासाठी फिरकत नाही. जिथे उमेदवार कोण आहे हेच मतदारांना माहित नसतं अशा गडचिरोलीच्या दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात मतदान प्रक्रिया पार पाडणं अत्यंत कठिण काम ठरतं. परंतु, नक्षलवादाचे सावट असतानाही गडचिरोलीतील दुर्गम आणि अतिसंवेदनशील गावांमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.
नागपूर : सध्या दुपारी उन्हाचा पारा चढत असल्यानं नागरिकांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांसमोर रांगा लावलेल्या दिसत आहेत. मतदारांमध्ये मतदानासाठी मोठा उत्साह दिसून येतोय.
भंडारा : भंडारा - गोंदिया लोकसभा क्षेत्राचे आघाडीचे उमेदवार नाना पंचबुधे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
नागपूर : पूर्व विदर्भात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. नागपुरात वृद्ध दाम्पत्यही यात मागे नव्हतं. चालता येत नसताना केवळ खुर्चीवर बसवून उचलून त्यांना मतदान केंद्रावर आणण्यात आलं होतं.
Maharashtra: A 92 year old voter DN Sanghani accompanied by his son and daughter in law after casting their votes at a polling booth in Gondia #LokSabhaElections2019 pic.twitter.com/niom1ttOOn
— ANI (@ANI) April 11, 2019
नागपूर : मूळचं नागपूरचं परंतु, कामानिमित्तानं अमेरिकेत असणारं एक जोडपंही खास आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज नागपूरमध्ये दाखल झालं... सकाळीच अमृत कपारे आणि त्यांच्या पत्नी आपल्या तीन महिन्यांच्या तान्हुलीसह मतदान केंद्रावर हजर झाले. भाऊजी दप्तरी शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी आपलं मत नोंदवलं.
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे मतदानासाठी सपत्निक हजर झाले. यावेळी त्यांनी लोकशाहिला बळकट करण्यासाठी मतदारांना मतदानाचं आवाहनही केले. भंडारा गोंदिया जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली असून या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे मतदारसंघाचा विचार केला असता या ठिकाणी १८ लाख ८ हजार ९४८ मतदार आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्यात एकूण २१८४ इतके मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर १० हजार ५३९ इतके कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आले आहे. तर तीन हजारहुन अधिक पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्यात १२ अतिसंवेदनशील केंद्र घोषित करण्यात आले आहेत तर या ठिकाणी प्रमुख लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी आहे.
यवतमाळ : यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड निर्माण झालाय. त्यामुळे अजून मतदानाला सुरूवात झालेली नाही. महात्मा फुले शाळेतल्या केंद्रावर मतदान यंत्र बिघडलंय. मतदान यंत्र दुरूस्त करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Maharashtra: Voting underway at a polling booth in Allapalli village, in Gadchiroli #LokSabhaElections2019 pic.twitter.com/6kImZ8kwPl
— ANI (@ANI) April 11, 2019
गडचिरोली : नक्षल्यांच्या धमकीला भीक न घालता गडचिरोलीतही शांततेत मतदानाला सुरूवात झालीय. अनेक मतदारांनी सकाळी सकाळीच मतदानकेंद्राकडे धाव घेतली. उन्हाचा पारा चढायच्या आतच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली. मतदान केंद्रावर पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता नागरिकांनी पुढे येऊन मतदान करण्याची आवाहन सातत्याने केलं जातंय. जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची जबाबदारी नागरिकांनी पार पाडणं गरजेचं आहे. नक्षलप्रभावित भागात सकाळी ७ ते ३ पर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे.
नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी ७.०० वाजताच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भाऊजी दप्तरी शाळेतल्या मतदान केंद्रावर पोहचले. २१६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्रावर मतदान करणारे मोहन भागवत पहिले मतदार ठरले. त्यांच्यासोबत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनीही मतदान केलं.
Maharashtra: RSS Chief Mohan Bhagwat present at polling booth number 216 in Nagpur, to cast his vote for #LokSabhaElections2019 . Voting on 7 parliamentary constituencies in the state will be held today. pic.twitter.com/EAcsBoi3Mp
— ANI (@ANI) April 11, 2019