Raigad gas leak : अन् थोडक्यात अनर्थ टळला... गॅस गळतीमुळे 7 कामगारांची प्रकृती बिघडली

वायुगळतीमुळे 7 कामागारांना त्रास झाला. या कामगारांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Updated: Jan 22, 2021, 02:18 PM IST
Raigad gas leak : अन् थोडक्यात अनर्थ टळला... गॅस गळतीमुळे 7 कामगारांची प्रकृती बिघडली title=

महाड : लॉकडाऊनंतर पुन्हा सुरू नियमित सुरू झालेल्या कारखान्यातील कामगारांवर संकट कोसळलं आहे. इंडो अमाईन कारखान्यात वायुगळती झाली आहे. या वायुगळतीमुळे 7 कामागारांना त्रास झाला. या कामगारांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायगडमधील महाड इथल्या औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली.

कारखान्यात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास काम सुरू असताना हायड्रोजन सल्फाईडची गळती झाली. हे लक्षात येताच फायर अँड सेफ्टीची टीम बोलावण्यात आली. गळती थांबवण्यात यश आले असले तरी कंपनीच्या परिसरात कुणाला प्रवेश दिला जात नाही. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे .

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कारखान्याच्या परिसरात सर्वांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. सध्या 7 कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गॅस गळतीची माहिती वेळीच कळल्यानं आणि लक्षात आल्यानं यंत्रणा अलर्ट झाली. त्यामुळे कारखान्यातील मोठा अनर्थ सुदैवानं टळला आहे.