Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. इथं काही उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्जही दाखल केले आहेत. पण, मविआत सुरु असणारा गोंधळात गोंधळ मात्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीय. सध्या मविआमध्ये पुन्हा एकदा अशीच काहीशी परिस्थिती उदभवली असून, तीन मतदारसंघात दोन पक्षाचे उमेदवार असल्यामुळं तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
मविआतून दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनं आधी पवन जैसवाल यांना उमेदवारी दिली. त्यानंतर काँग्रेसनं माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली. सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेनेनं आधी अमित रतिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर काँग्रेसनं दिलीप माने यांना उमेदवारी जारी केली. तिथं परांड्यात शिवसेनेनं दिवंगत आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजव रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीनेही राहुल मोटे यांना उमेदवारी डाहीर केली. ज्यामुळं आता मविआतील हा तिढा नेमका कसा सुटणार याचीच चिंता अनेकांना लागली आहे.
तिथं मविआत काँग्रेस, राष्ट्रवदी शरद पवार, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना प्रत्येकी 90 जागांचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र काँग्रेसनं आतापर्यंत 99 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे जाहीर फॉर्म्युल्याचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिंदखेडा
शिरपूर
अकोला पश्चिम
दर्य़ापूर
वरुड मोर्शी
पुसद
पैठण
बोरिवली
मुलुंड
मलबार हिल
कुलाबा
खेड आळंदी
दौड
मावळ
औसा
उमरगा
माढा
वाई
माण
सातारा
मिरज
खानापूर
मविआतील ही परिस्थिती येत्या काळात त्यांच्या फळीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळं आता मतभेद बाजूला सारत एकमतानं कोणते निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहणार यात दुमत नाही.