बापरे हा कसला खेळ? खुन्नस, मेैत्री काही नसतानाही 'त्या' चौघांनी तरूणाच्या शरीरासोबत...

चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर परिसरात मेजर स्टोअर्स गेट समोर राहणाऱ्या 35 वर्षीय महेश मेश्राम याची 3 ते 4 जणांनी मिळून रात्री हत्या केली.

Updated: Nov 9, 2022, 10:57 AM IST
बापरे हा कसला खेळ? खुन्नस, मेैत्री काही नसतानाही 'त्या' चौघांनी तरूणाच्या शरीरासोबत... title=

आशीष आबांडे, झी मीडिया, चंद्रपुर: हल्लीच्या समाजात अनेक धक्कादायक प्रकार हे घडतं असतात. त्यामुळे समाजात कशाचीच शाश्वती देता येत नाही. त्यामुळे (crime news) आजकाल सगळेजण फारच चिंताग्रस्त झालेले पाहायला मिळतात. सध्या असाच एक प्रकार चंद्रपुर (chandrapur)  शहरात घडला आहे. हा प्रकार वाचून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. हा प्रकार घडल्यामुळे आसपासच्या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. (maharashtra crime News Chandrapur 35-year-old man murdered play football with his severed head crime news marathi)

चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर परिसरात मेजर स्टोअर्स गेट समोर राहणाऱ्या 35 वर्षीय महेश मेश्राम याची 3 ते 4 जणांनी मिळून रात्री हत्या केली. दुर्गापूर मुख्य मार्गावर हे हत्याकांड घडले. आरोपीनी आधी महेश मेश्राम याला मारहाण केली, त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचं शीर धडावेगळे केलं. महेश मेश्राम (mahesh meshram) याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तर शीर काही अंतरावर पडले होते. 

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

मृतक महेश मेश्राम याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. या हत्येमागे एखादी टोळी आहे का? आरोपी व मृतकाचा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मात्र पोलिसांनी संशयाच्या आधारे सध्या 2 आरोपीना अटक केली आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने झालेल्या या हत्येने शहर-परिसर हादरला आहे. 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

या प्रकरणी पोलिसांचा तपास चालू असून रविंद्रसिंग परदेशी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी दिलेल्या माहितीनूसार, या प्रकरणी दोन आरोपींनी तात्काळ पकडण्यात आले आहे. काही लोकांनी या तरूणाला फार वाईट पद्धतीनं मारण्यात आलं आहे आणि हा राग पुर्व वैमन्यातून आला होता अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी सांगितली आहे.