ओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका

दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 2, 2017, 03:51 PM IST
ओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका title=
छाया सौजन्य : पीटीआय

मुंबई, रत्नागिरी : दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.

घरांचे नुकसान, मच्छिमार समुद्रात बेपत्ता 

ओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा बसून १३ जणांना मृत्यू झालाय. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले असून घरांचा याचा फटका बसलाय. तर काही मच्छिमार समुद्रात बेपत्ता आहेत. त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, १२० किमी वेगाने वारे वाहत असून ते लक्षद्वीप समूहाकडून अरबी समुद्राकडे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातही हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

वाऱ्याचा वेग वाढणार, मच्छिमारांना इशारा

 दरम्यान, वाऱ्याचा वेग अधिक वाढण्याची शक्यता वेधशाळा आणि हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हवामान खात्यांने महाराष्ट्र-गोव्यात वादळ धडकण्याची शक्यता वर्तविली आहे. चक्रीवादळाच्या तडाख्याने दक्षिण भारतात १३ जणांचा बळी गेले असून अनेक बेपत्ता आहेत.