राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ

महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. 

Updated: Jul 10, 2020, 08:53 PM IST
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे तब्बल ७८६२ रुग्ण वाढले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २,३८,४६१ एवढी झाली आहे. कोरोनाच्या या एकूण रुग्णांपैकी ९५,६४७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १,३२,६२५ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात ५,३६६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहेत. 

राज्यामध्ये आज दिवसभरात २२६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९,८९३ एवढी झाली आहे. 

कल्याण-डोंबिवलीमध्येही लॉकडाऊन वाढवला

राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिकांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये १९ तारखेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. तर पुण्यामध्येही पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून म्हणजे १४ जुलैपासून १० दिवसांसासाठी पुणे जिल्हा लॉकडाऊन करण्यात येईल.

ठाण्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढवला

पुण्यातही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय