ठाण्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढवला

ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Jul 10, 2020, 07:36 PM IST
ठाण्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढवला title=
प्रातिनिधिक फोटो

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव बघता लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. 

याआधी ठाण्यातला लॉकडाऊन २ जुलै ते १२ जुलै सकाळी ७ वाजेतपर्यंत होता. पण रोजची कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या बघता ८ दिवसांनी हा लॉकडाऊन वाढवला गेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अटी आणि नियम हे मागच्या लॉकडाऊनप्रमाणेच कायम राहतील. ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी हे आदेश काढले आहेत. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही २ जुलै ते १२ जुलै या दरम्यान लॉकडाऊन घेण्यात आला आहे. तर सोमवारी मध्यरात्रीपासून म्हणजे १४ जुलैपासून १० दिवसांसासाठी पुणे जिल्हा लॉकडाऊन करण्यात येईल.

पुण्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन