आजही राज्यात कोरोनाचे २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

आजच्या दिवसातही राज्यात कोरोनाचे २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत.

Updated: Sep 8, 2020, 09:46 PM IST
आजही राज्यात कोरोनाचे २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले title=

मुंबई : आजच्या दिवसातही राज्यात कोरोनाचे २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाचे २०,१३१ रुग्ण सापडले आहेत, तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,४३,७७२ एवढा झाला आहे, यापैकी २,४३,४४६ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर ६,७२,५५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या एका दिवसात १३,२३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातलं कोरोना रुग्ण बरे व्हायचं प्रमाण ७१.२६ टक्के एवढं आहे. 

महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोरोनाच्या ४७,८९,६८२  एवढ्या टेस्ट करण्यात आल्या, यापैकी ९,४३,७७२ टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. म्हणजेच राज्यातलं कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण १९.७ टक्के एवढं आहे. 

महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनामुळे २७,४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातलं कोरोना मृत्यूचं प्रमाण २.९ टक्के एवढं आहे. 

आजच्या एका दिवसात मुंबईमध्ये कोरोनाचे १३४६ रुग्ण आढळले आहेत, तर ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक मनपा क्षेत्रात कोरोनाचे १४२० रुग्ण आढळले असून एका दिवसात १२ जणांना जीव गमवावा लागला आहे. पुणे मनपा क्षेत्रात एका दिवसात कोरोनाचे १,७११ रुग्ण आढळले असून ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. नागपूर मनपा क्षेत्रात कोरोनाचे आज १,१२४ रुग्ण आढळले आणि ५३ जणांचा मृत्यू झाला. 

पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,०७,४३५ एवढी आहे, यापैकी १,४०,०३८ रुग्ण बरे झाले आहेत, तर ६२,८५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे ४,५३८ जणांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा १,५८,७५६ एवढा आहे. यापैकी १,२५,९०६ रुग्ण बरे झाले असून २४,५६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनामुळे ७,९४२ मृत्यू झाले आहेत. 

ठाणे जिल्ह्यात १,४६,२२० कोरोनाबाधित रुग्ण आहेत, यापैकी १,१६,३५९ रुग्ण बरे झाले आहेत, तर २५,८५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे ४,००८ मृत्यू झाले.

नाशिकमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ४८३१६ एवढा आहे, यापैकी ३६९२७ रुग्ण बरे झाले आहेत, तर १०४०० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ९८९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये ४०८६१ कोरोनाबाधित आहेत, यापैकी २२४८० बरे झाले असून १७,२६९ रुग्ण उपचार घेत आहेत. ११०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.