"फडणवीसजी मुर्खांना आवरा", संजय राऊतांनी दिला सल्ला; म्हणाले 'तुम्ही मांडीवर घेतलेले मूर्ख...'

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) निर्णय देण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहे. यादरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खडे बोल सुनावले आहेत.   

शिवराज यादव | Updated: May 11, 2023, 12:13 PM IST
"फडणवीसजी मुर्खांना आवरा", संजय राऊतांनी दिला सल्ला; म्हणाले 'तुम्ही मांडीवर घेतलेले मूर्ख...' title=

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) निर्णय देण्याआधी सत्ताधारी आणि विरोधक आपल्या बाजूने निकाल येईल असा विश्वास व्यक्त करत आहे. यादरम्यान दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. त्यातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खडे बोल सुनावले आहेत. 

फडणवीसांनी निकालाआधी बोलणं मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की "तेच अनेक दिवस बोलत आहेत. आम्हाला निकालाची चिंता करण्याची गरज नाही असं म्हणण्याचा मूर्खपणा तेच करत आहेत. आता त्यांना बुद्दी सुचलवी असेल तर त्यांना सत्याची जाणीव झाली असेल. ते आणि ज्यांना मांडीवर घेतले मुर्खच आपल्या बाजूने निकाल लागेल असं म्हणत आहेत. फडणवीसांनी या मूर्खांना आवरलं पाहिजे". 

"मला न्यायची आपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेणारे नाही. जे न्याय विकत घेऊ शकतात ते सत्तेवर आहेत. त्यांना निकाल आपल्या बाजूने येईल असं वाटत आहे, कारण आपण न्याय विकत घेऊ शकतो हा मस्तवलापणा आहे. पण आमचा न्यायावर विश्वास आहे. घटनापीठाने प्रदीर्घ काळ सुनावणी घेतली आहे. हा जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तसाच तो देशाला संविधान, घटना देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय लोकशाही. संविधानाची हत्या करणार नाही अशी खात्री आहे. आजचा निर्णय या देशात लोकशाही आहे की नाही, स्वातंत्र्य टिकलं आहे की नाही,  संसद आणि विधानसभेचं महत्व आहे की नाही, न्यायालये स्वतंत्र आहेत की नाही हे आज स्पष्ट होईल," असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

"जेव्हा 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला तेव्हा नरहरी झिरवळ अध्यक्ष होते. सध्याचे विधानसभा अध्यक्ष माझ्याकडे निर्णय येईल असं सांगत आहेत. तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवलं आहे. तुमची नियुक्तीच घटनाबाह्य आहे. त्यामुळे हा निर्णय नरहरी झिरवळ यांच्याकडे आला पाहिजे," असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

अजित पवारांवर टीका

अजित पवार यांनी सरकारला धोका नाही असं म्हटलं असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊतांनी हे त्यांचं मत असू शकतं असं म्हटलं आहे. "मी महाविकास आघाडीचा नेता आणि शिवसेनेचा खासदार असून मला वाटतं सरकारला धोका आहे. कारण मी जो पक्ष, आघाडीचं प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांचं मनोबल वाढवेन. जर 16 आमदार अपात्र झाले तर उरलेले 24 देखील अपात्र होतील आणि सरकार कोसळेल. सरकारला धोका नाही असं कसं काय कोणी बोलू शकतं? जर मुख्यमंत्री अपात्र झाले तर हे सरकार आणि बंडखोरांचा गट संपेल".