मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की...

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सुट्टीवर गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री नॉट रिचेबल असल्याचा प्रश्न विचारणा-याला विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही चांगलेच सुनावले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Apr 25, 2023, 06:58 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की... title=

Ajit Pawar On CM Eknath Shinde : राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच आता राज्याच्या राजकारमात नाट्यमय घडामोडी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. मुख्यमंत्री शिंदे अचानक सुट्टीवर गेले आहेत. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  शिंदे गटानं नाराजीच्या चर्चा फेटाळल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत का अशा प्रश्न विचारला असता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर देकील चर्चा रंगली आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सुट्टीवर गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री नॉट रिचेबल असल्याचा प्रश्न विचारणा-याला विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही चांगलेच सुनावले आहे. 

मुख्यमंत्री गावाच्या जत्रेला गेले -  मंत्री उदय सामंत यांचा खुलासा

मुख्यमंत्र्यांना नाराज म्हणणा-याचा सत्कार करु. मुख्यमंत्री गावाच्या जत्रेला गेले आहेत असे  उदय सामंत म्हमाले.  शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील  असंही उदय सामंत म्हणाले. 

अजित पवारांनीही सुनावल

नॉट रिचेबल माझ्यापुरतं बस्सं अस म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल का आहेत असा प्रश्न विचारणाऱ्यांना अजित पवार यांनी चांगलेच सुनावले आहे.  मुख्यमंत्री सुट्टीवर गेले हे CMO ला विचारा. मला विचारु नका असही अजित  अजित पवार म्हणाले. 

सरकारला धोका नाही - अब्दुल सत्तार

भाजप आणि अजित पवार यांच्यातील आंख मीचोली हा त्यांच्यातील विषय आहे.  सरकारला कोणातही धोका नाही असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री त्यांच्या गावी गेले आहेत त्यांनी सुट्टी घेतलेली नाही. 24 तासांतील 18 ते तास काम करत आहेत. यामुळे ते बदल म्हणून ते गावी गेले आहेत. 

मुख्यमंत्री सुट्टीवर नाही गेले नाहीत - शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

मुख्यमंत्री सुट्टीवर गेले नसून ते मुख्यमंत्री शासकीय दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिवेंद्र राजे भोसले यांची भेट घेतली आहे.  मुख्यमंत्री गावी गेले असतील आणि तिथून पण काम करत असतील आणि म्हणून संजय राऊत टीका करत असतील. तर, गेल्या अडीच वर्ष जे आधीचे मुख्यमंत्री होते ते नॉट रिचेबल होते. मुख्यमंत्री दालनात कधी गेले नाहीत, कधी मंत्रालयात बसले नाहीत कोणता दौरा त्यांनी केला नाही त्यावेळी संजय राऊत का मूग गिळून गप्प बसले होते असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील दरे या त्यांच्या गावी सुट्टी साठी आलेले आहेत. मंगळावारी त्यांनी शेतामध्ये फेरफटका मारला आणि शेतीची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी भेटायला आलेल्या लोकांच्या भेटी देखील त्यांनी घेतल्या.