Chhagan Bhujbals: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली होती. येवल्यात छगन भुजबळ उमेदवार म्हणून देण ही माझी चूक होती, यासाठी मला माफ करा, असे शरद पवार म्हणाले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज्यभरात माफी मागत फिरणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करणाऱ्या माणिकराव शिंदे यांच्यावर 2020 ला शिस्तभंग करत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. असे असतांना त्यांनी तारीख घेतली आणि पवारांना येवल्यात आमंत्रण दिले. येवल्यातील बहुतांशी तरुण माझ्या स्वागताला होते मात्र जे थकलेले वृद्ध जे काही काम करत नाही ते पवारांच्या सभेला उपस्थित होते, असे ते म्हणाले.
शिवसेनेत मी नेता होतो. दोन वेळा आमदार आणि महापौर होतो. त्यामुळे मी ऐरागेरा नाही, असे ते म्हणाले.
तेलगी घोटाळ्यात माझ्यावर आरोप झाले आणि माझे उपमुख्यमंत्री पद गेले. त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली त्यात मी निर्दोष झालो.मला कारण नसता राजीनामा द्यावा लागला, अशी खंत भुजबळ यांनी बोलून दाखवली.
जुन्नर येवला आणि इतर काही ठिकाणी मला उमेदवारीची गळ स्थानिकांनी घातली होती. म्हणून पवार साहेबांना मला येवल्यात विकासासाठी पाठवा असे सांगितले. त्यामुळे येवल्यात पवारांनी माझी नाही तर मी येवल्याची निवड केली.सुरक्षित मतदारसंघ वगैरे नव्हता पण आपण जे काम केले त्यावर चार वेळेस निवडून आलो असे भुजबळ यांनी सांगितले.
मी वीस वर्षांपूर्वी अंदाज चुकलो असे पवारांनी म्हणणे साफ चुकीचे आहे.बारामतीनंतर खरा विकास झाला येवल्यात झाला आहे.3: येवल्यात माफी मागितली आता पन्नास ठिकाणी तुम्ही माफी मागत फिरणार का? असा प्रश्न भुजबळांनी पवारांना विचारला आहे.