'अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है...' ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान

राजन साळवींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Updated: Oct 20, 2022, 02:44 PM IST
'अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है...' ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान title=

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी राणे कुटुंबाबद्दल (Rane Family) सूचक विधान केलंय. नितेश राणे (Nitesh Rane) हे आमचे विरोधक आहेत. पण, बाळासाहेबांच्या वलयामुळे राणे कुटुंबीय मोठे झालंय. 'अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है' असं विधान साळवींनी केलं आहे. साळवींना नक्की म्हणायचंय काय...? या विधानाचा अर्थ काय...? साळवी आणि राणेंची जवळीक वाढलीय का...? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतायत.

ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाने बालेकिल्ला कायम राखलाय. यानिमित्ताने राजन साळवी यांनी विविध ग्रामपंचायतीने भेट देत मतदारांचे आभार मानले. यावेळी बोलताना कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यावचं लागतं ही आमची भूमिका असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलंय. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्यासंदर्भात बोलताना राजन साळवी यांनी हे वक्तव्य केलं आहे. भास्कर जाधव हे शिवसेनेचे (Shivsena) आक्रमक नेते आहेत, त्यांच्या मनात आणि ह्रदयात जे आहे तेच त्यांच्या ओठावर येतं असं राजन साळवी यांनी सांगितलं. तसंच भ्याड हल्ल्याला उत्तर देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (SSUBT) कार्यकर्ते सक्षम असल्याचंही साळवी यांनी म्हटलंय.

नितेश राणे यांनी केलं होतं वक्तव्य
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते नितेश राणे यांनी गौप्यस्फोट केला होता. ये अंदर की बात है, राजन साळवी हमारे साथ है, असं नितेश राणे म्हणाले होते. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्यासाठी भास्कर जाधव विनवण्या करत होते, असा खुलासाही नितेश राणे यांनी केला होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x