Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather News : कधी होणार मान्सूनचं आगमन? राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती की अवकाळीचं थैमान. पाहा हवामान विभागानं दिलेलं सविस्तर हवामान वृत्त   

सायली पाटील | Updated: May 16, 2024, 08:11 AM IST
Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा  title=
Maharashtra Weather News monsoon updates hailstiorm predictions in nashik storm winds in konkan region

Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये तापमानाच बरेच चढ, उतार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कुठे अवकाळी पावसाच्या सरी, तर कुठे उन्हाचा वाढता दाह अशीच एकंदर परिस्थिती असल्यामुळं राज्यावरील हवामान काही अंशी संकटं वाढवताना दिसत आहे. त्यातच काही भागांमध्ये मात्र पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाल्यामुळं आता मान्सूनचं येणं फार दूर नाही, ही वस्तूस्थिती पाहता अनेकांना दिलासाही मिळताना दिसत आहे. 

पुढील 24 तासांमध्ये राज्यातील या पूर्वमोसमी पावसाच्या सरी कायम राहणार असून, कमाल तापमानात वाढ नोंदवली जाऊ शकते. तर, नगर आणि नाशिकच्या काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आपला आहे. कोकणात मात्र उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट कायम राहणार असून, मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह गडगडाटी वादळ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मान्सूच्या आगमनाची तारीख पाहिली? 

राज्यातील वाढत्या उकाड्यापासून लवकरच नागरिकांची सुटका होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण-पश्चिम मान्सून (Monsoon) 31 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे. हवामान विभागानुसार मान्सून केरळमध्ये पोहचण्याची सरासरी तारीख आता 1 जून असू शकते. थोडक्यात एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल होणार असा अंदाज आहे. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि बंगालच्या काही भागात 19 मपर्यंत मान्सून दाखल होईल, त्यानंतर केरळकडे आगेकूच करेल. यावर्षी सामान्य ते अधिक स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.