Maharashtra Weather News : राज्यातील वादळी पावसानं उघडीप दिलेली असतानाच त्यानं पूर्णपणे पाठ सोडेलली नाही हेसुद्धा तितकंच खरं. पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. तर, दक्षिण महाराष्ट्रामध्ये ही पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील पावसाच्या सरी, वादळी वारे आणि तापमानाची बदल हा सध्या येऊ घातलेल्या चक्रीवादळाचा परिणाम नाही असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
कोकणातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी राहणार असून, यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार आहेत. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह साताऱ्यातही घाटमाथ्यावर वातावरणात आल्हाददायक गारवा पाहायला मिळणार आहे. राज्यातील एकंदर तापमान 34 अंशांच्या दरम्यान राहणार असून, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उन्हाचा दाह अधिक जाणवणार आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं पुढे चक्राकार वारे आणि त्यानंतर चक्रीवादळात रुपांतर करालं असून, हे वादळ सायंकाळपर्यंत आणखी गंभीर रुप धारण करु शकतं. ज्यानंतर पुढे ओडिशा आणि भुवनेश्वरसह पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागांमध्ये चक्रीवादळाचे परिणाम दिसून येतील. या भागांमध्ये दरम्यानच्या काळात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, सदर क्षेत्रांमध्ये समुद्रकिनारी भागात मोठाल्या लाटा उसळणार असल्यानं नौका समुद्रात न उतरवण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Dana Cyclone)
Deep Depression over Eastcentral Bay of Bengal (Cyclone Alert for Odisha and West Bengal coasts: Yellow Message)
The deep depression over Eastcentral Bay of Bengal moved west-northwestwards with a speed of 3 kmph during past 6 hours, and lay centred at 2330 hrs IST of yesterday,… pic.twitter.com/4km3DRnycy— India Meteorological Department (@Indiametdept) October 22, 2024
24 आणि 25 ऑक्टोबर रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात वादळाचा लँडफॉल सुरु होणार असून, यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 120 किमी इतका असल्यामुळं सध्या या भागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.