Viral Video: सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान असाच एक महिला आणि तिच्या मुलीचा पर्स खऱेदी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल होण्याचं कारण म्हणजे, महिलेने आपल्या मुलीला हनिमूनला लिप्स्टिक ठेवता यावी यासाठी आलिशान हर्मीस मिनी केलीची (Hermes Mini Kelly) तब्बल 26 हजार डॉलर्स म्हणजेच 27.5 लाखांची बॅग घेतली आहे. ही बॅग खरेदी करताना मुलगी आपल्याला हनिमूनला लिप्स्टिक ठेवण्यासाठी बॅग हवी असल्याने जास्त मोठी नको असं सांगत असल्याचं दिसत आहे.
Love Luxury या अकाऊंटला हा मूळ व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ही कंपनी डिझायनर वस्तूंची विक्री करते. व्हिडीओमध्ये ज्यामध्ये आई स्वतःची ओळख करून देत या आलिशान दुकानात येण्याचं कारण सांगते. "मी मुंबईची आहे. मला माझ्या मुलीसाठी एक बिर्किन खरेदी करायची आहे. तिचे डिसेंबरमध्ये लग्न होणार आहे," असं त्या सांगतात. दरम्यान मुलगी यावेळी आपल्याला मिनी केलीची बॅग हवी असल्याचं सांगते.
यावेळी महिला आपल्या मुलीला मोठी बॅग निवड असा सल्ला देते. पण मुलगी आपल्याला फक्त लिप्स्टिकसाठी बॅग हवी असल्याचं सांगते. यावेळी पॅलेडियम आणि गोल्ड हार्डवेअरसह विविध पर्याय सादर केले आहेत. यामध्ये पांढरा, काळा आणि निळा असे अनेक रंगांचेही पर्यात आहेत. अखेर मुलगी सफेद रंगाची निवड करते.
हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, "तुम्ही फक्त लिप्स्टिक ठेवण्यासाठी 26 हजार डॉलर्सची बॅग घ्याल का?".
या व्हिडीओला 2 मिलियनला जास्त व्ह्यू मिळाला आहेत. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चाही रंगली आहे. टीकाकार आणि समर्थक दोघांनीही इतका खर्च करण्यावर टीका केली आहे आणि इतक्या महागड्या खरेदीच्या प्राधान्यक्रमांवर आणि मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
एकाने कमेंट केली आहे की, "लग्नासाठी 26 हजार डॉलर्स मोजले. काही लोकांकडे किती पैसा आहे. मलाही बॅग आवडतात, पण इतके पैसे मोजणार नाही". तर एका युजरने म्हटलं आहे की, "मी असतो तर इतका पैसा तिच्या भविष्यातील घर किंवा इतर गोष्टीत गुंतवला असता".
एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाने इतक्या पैशात अख्खं लग्न केलं असतं अशी कमेंट एकाने केली आहे. तथापि, काहींनी बॅग आकर्षित असल्याचं म्हटलं आहे. एकाने कमेंट केली आहे की, "त्या सुंदर बॅगा आहेत आणि मी नेहमीच पाहतो, परंतु मी कधीही यापैकी एकही परवडणार नाही. आणि जर मला शक्य झाले असते तर मी कदाचित त्या बॅगवर खर्च करणार नाही."