Malin Landslide: 44 घरं ढिगाऱ्याखाली, 151 मृतदेह; माळीण दुर्घटनेची काळीज चिरणारी आठवण

Malin Landslide: पहाटेच्या वेळी माळीण गावच्या वर असलेला डोंगराचा कडा खाली आला. कोणाला काही कळण्यााधीच 44 हून अधिक घरं ढिगाऱ्याखाली गेली. त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी जनावरे, कोणीच ती पहाट पाहिली नाही. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 20, 2023, 10:02 AM IST
Malin Landslide: 44 घरं ढिगाऱ्याखाली, 151 मृतदेह; माळीण दुर्घटनेची काळीज चिरणारी आठवण title=

Malin Landslide: जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत असणाऱ्या आदिवासी ठाकूरवाडीवर दरड कोरळली असून यामध्ये 4 गावकऱ्यांचा आणि बचावकार्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू ओढावला आहे. इथं 25 हून अधिक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली गेली असून त्यातून जवळपास 75 जणांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही किती नागरिक ढिगाऱ्याखाली आहेत हे सांगणे, अवघड आहे. या घटनेने सर्वांना 9 वर्षापूर्वी घडलेल्या माळीण घटनेची आठवण झाली आहे. 

जुन्नर तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळल्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. ही घटना महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. माळीण गाव झोपेत असताना ही दरड कोसळली आणि अनेकांनी ती पहाट पाहिलीच नाही. माळीणमध्ये  151 जणांनी आपले प्राण गमावले होते. सकाळी माळीण गावावर डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ माळीण गावातील 74 पैकी 44 घरे दबली गेली होती.जवळजवळ संपूर्ण माळीण गाव क्षणार्धात गायब झाले होते. 

आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव भीमाशंकर पासून 20 किमी आणि पुण्यातून 75 ते 80 किमी अंतरावर डिंभे धरणाच्या परिसरात होतं. दुर्घटना घडली त्यावेळी गावाची लोकसंख्या 750 च्या आसपास असावी, असे सांगितले जाते.

पहाटेच्या वेळी माळीण गावच्या वर असलेला डोंगराचा कडा खाली आला. कोणाला काही कळण्यााधीच 44 हून अधिक घरं ढिगाऱ्याखाली गेली. त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी जनावरे, कोणीच ती पहाट पाहिली नाही. 

मोबाइल इंटरनेट नसल्याने ही माहिती प्रशासनापर्यंत पोहचायला वेळ लागला होता. माळीण गावची दुर्घटना एका एसटी चालकामुळे समोर आली होती. 

एकीकडे मुसळधार पाऊस चालू असतानाच संपूर्ण मातीचा ढिगारा माळीण गावावर पसरला होता. दिवस-रात्र त्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. सहा दिवसात जवळपास 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यातील 9 जणांना जीवदानही देण्यात आले होते. आज या अंगावर काटा आणणाऱ्या आठणवी जाग्या झाल्या आहेत.

 4 दिवसात खूप पाऊस

इरशाळगडमधील तीस पेक्षा जास्त घरावर दरड कोसळली आहे.  मलब्याखाली 100 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.माळीण दुर्घटना घडल्यानंतर आपण भूवैज्ञानिकांकडून राज्याची काय स्थिती आहे याची माहिती मागवली होती. त्यामध्ये राज्यात दरडप्रवण, भूसख्खल होऊ शकणाऱ्या कोणत्या जागा आहेत, याची माहिती मागविण्यात आली होती. त्यामध्ये इरसालवाडीच्या या जागेचा समावेश नव्हता. पण गेल्या 4 दिवसात येथे खूप पाऊस पडल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.