MLC Election Result 2023 : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात माविआचा दणदणीत विजय, 12 वर्षाची परंपरा उद्धवस्त!

MLC election maharashtra 2023: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र, त्याचा प्रभाव दिसून आला नाही. 

Updated: Feb 2, 2023, 08:45 PM IST
MLC Election Result 2023 : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात माविआचा दणदणीत विजय, 12 वर्षाची परंपरा उद्धवस्त!
Devendra Fadanvis,Nitin Gadkari

Nagpur Constituency Election Result: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात (Nagpur Constituency MLC election) चुरशीची निवडणूक पहायला मिळाली. या निवडणुकीत (MLC Election Result 2023) भाजपने पाठिंब्यावर उभे राहिलेल्या नागोराव गाणार (Nagorao Ganar) यांचा पराभव झाल्याचं पहायला मिळालं आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या सुधाकर अडबाले (Sudhakar Adabale) यांचा दणदणीत विजय झाला. त्यामुळे आता फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) बालेकिल्ल्यात आघाडीचा झे़ंडा फडकल्याची चर्चा सुरू झाली आहे. (MLC Election Result Sudhakar Adabale beat Nagorao Ganar by seven thousand votes in Nagpur Election Result shock to BJP marathi news)

जुनी पेन्शन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्या अनुषंगाने शिक्षकांनी मतदान  सुधाकर अडबाले यांच्या बाजूनं केल्याचं पहायला मिळतंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र, त्याचा प्रभाव दिसून आला नाही. सुधाकर अडबाले यांना पहिल्या पसंतीची तब्बल 55 टक्के मतं मिळाली. 

सुरूवातीलाच अडबालेंनी आघाडी घेतली होती. या निवडणुकीत सुरुवातीपासून ट्विस्ट पहायला मिळाले. हळूहळू निकाल (Nagpur Constituency Election Result) समोर आले आणि महाविकास आघाडीच्या उमदेवारने जोरदार मुसंडी मारली. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याचं पहायला मिळतंय.  

आणखी वाचा - MLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

दरम्यान, निवडणुकीचं (MLC Election Result 2023) हे अपयश भाजपचं अपयश म्हणता येणार नाही. भाजपचा एबी फॉर्म नाही, त्यामुळे भाजपचा उमेदवार नाही. जर भाजप उमेदवार असता तर अजून काही वेगळं चित्र असतं, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिलं आहे. त्यामुळे भाजप पराभवानंतर हात झटकतंय का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.