कसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद, कोकण रेल्वे ठप्प

Monsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. 

Updated: Jul 22, 2021, 02:19 PM IST
कसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद, कोकण रेल्वे ठप्प

मुंबई : Monsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे कर्जत बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान रुळावर अनेक ठिकाणी पाणी आल्याने या दोन्ही स्थानका दरम्यान रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली आहे. तसेच बदलापूर अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे सेवा बंद आहे. मात्र अंबरनाथहुन मुंबईच्या दिशेने लोकल सेवा सुरु आहे. पुण्याकडे जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस रात्री बारा वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकावर उभी आहे. ( Landslide in Kasara Ghat; Traffic to Nashik, Pune closed, Konkan Railway jammed)

टिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नाशिक आणि पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली. तर अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचे मोठे 

राज्याच्या जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह कल्याण, कर्जत, कसारा, महाड, रत्नागिरी, चिपळूण, खेड आदी ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असून, पावसामुळे पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. टिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे. 

कोकण रेल्वे वाहतूक ठप्प

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातही जोर धरला आहे. अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला मोठा पूर आला आहे. वाशिष्ठी नदी पुलाला पाणी लागले असून बहाद्दूरशेख नाका येथे पाणी घुसले आहे. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. तर चिपळूण ते कामथे स्टेशनदरम्यान रुळावर पाणी आल्यानंतर कोकण रेल्वे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. मुंबईपासून चिपळूणपर्यंत रेल्वे वाहतूक सुरु पण चिपळूणच्या पुढे कोकण रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. 

मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी

दरम्यान, राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र नंतर रेड अलर्ट देण्यात आला. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भातील काही ठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.