पावसामुळे भिंत कोसळून मायलेकींचा मृत्यू...

पुणे शहरात दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 29, 2017, 10:12 PM IST
पावसामुळे भिंत कोसळून मायलेकींचा मृत्यू...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

पुणे : पुणे शहरात दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे हडपसर येथे भिंत कोसळून मायलेकींचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक लहान मुलगा देखील जखमी झाला. शीतल क्षीरसागर (वय २५) व दिव्या क्षीरसागर (वय ५) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. तर जखमी झालेल्या मुलाचे नाव विशाल आहे. त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मुसळधार पावसामुळे  दीपकनगर, गोपाळ पट्टी येथील घराचे पत्रे उडून गेले. याच परिसरात राहणाऱ्या शीतल आणि दिव्या क्षीरसागर यांच्यावर काळाने हल्ला केला. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे देखील कोसळली.