मुंबई : संजय लीला भन्सालींच्या पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी करणी सेनेचे कार्यकर्त्यांनी आज मुंबईत आंदोलन केलं.
भन्सालींच्या पद्मावत या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं नुकतीच मान्यता दिलीय. पण हा चित्रपट प्रदर्शित होऊच नये अशी करणी सेनेची मागणी आहे. आज याच मागणीसाठी करणीसेनेनं आंदोलन केलंय. यावेळी काही कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आलीय. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या सिनेमाला सेन्सॉरने हिरवा कंदील दिला असला तरी अनेक राज्यात सिनेमाचा विरोध होतोयं. आता गोव्यात या सिनेमाला विरोध झालाय.
राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांपाठोपाठ आता गोव्यातही ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला विरोध होत आहे, मात्र हा विरोध कुठल्या संघटनेने केला नसून खुद्द गोवा पोलिसांनी हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये याविषयी राज्य सरकारला पत्र लिहले आहे.
राज्यात पद्मावत प्रदर्शित झाल्यास राज्यातील पोलीस यंत्रणेवर ताण वाढेल, असं कारण गोवा पोलिसांनी पुढे केलं आहे. त्यामुळे भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यात विरोध होत असल्याने यामागे राजकारण असल्याची चर्चा आहे.