नागपूरकरांना मेट्रोची सफर मार्च महिन्यात होण्याचे संकेत

नागपूर मेट्रोची जॉय राईड मार्चमध्ये सुरू होणार आहे. खापरी ते एअरपोर्ट रोड मेट्रोचं कामही अंतिम टप्प्यात आले आहे. मेट्रो आणि रस्ते वाहतुकीसाठी डबलडेकर फ्लाय ओव्हर विशेष आकर्षण ठरणार आहे.

Updated: Jan 31, 2018, 10:58 PM IST
नागपूरकरांना मेट्रोची सफर मार्च महिन्यात होण्याचे संकेत title=

नागपूर : नागपूर मेट्रोची जॉय राईड मार्चमध्ये सुरू होणार आहे. खापरी ते एअरपोर्ट रोड मेट्रोचं कामही अंतिम टप्प्यात आले आहे. मेट्रो आणि रस्ते वाहतुकीसाठी डबलडेकर फ्लाय ओव्हर विशेष आकर्षण ठरणार आहे.

मेट्रोची जॉय राईड मार्चमध्ये सुरु

नागपूर मेट्रोची जॉय राईड मार्चमध्ये सुरु होण्याचे संकेत महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी दिले आहेत. तसेच खापरी, एअरपोर्ट स्टेशनचं कामही पूर्णत्वास आलं असून डबल डेकर फ्लायओव्हरचं कामही समांतर सुरु आहे. या डबल डेकर फ्लायओव्हरवरुन मेट्रो धावणार आहे. त्याखालील रस्ते वाहतुकीसाठी राहणार आहे.

सिग्नल आणि ट्रॅक तपासले जाणार 

नागपूरकरांना लवकरात लवकर मेट्रोची जॉयराईड देण्यासाठीची सगळी लगबग सुरु आहे. मार्च अखेरपर्यंत नागपूरकर या मेट्रोतून सफर करु शकतात, असे संकेत मिळत आहेत. कमिश्नर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीच्या चमूने नागपूर मेट्रो रेल्वेचा अ‍ॅटग्रेड सेक्शन आणि मिहान डेपोची नुकतीच पाहणी केली. पुढच्या दौ-यात सिग्नल आणि ट्रॅक तपासले जाणार आहेत. 

मेट्रोच्या खापरी आणि एअरपोर्ट स्टेशनचं कामही पूर्ण झालंय... डबल डेकर फ्लाय ओव्हरचं कामही वेगात सुरू आहे. या डबलडेकर फ्लायओव्हरच्या डिझाईनमुळे २० टक्के आर्थिक बचत होणार आहे.

डबल डेकर फ्लायओव्हर

वर्धा मार्गावरच्या या डबल डेकर फ्लायओव्हरसह मुंजे चौकातल्या इंटरचेंज स्टेशनपर्यंतचं काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. एकंदरीतच मार्च महिन्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नागपूरकरांना मेट्रोचा कूल प्रवास अनुभवता येणार आहे.