close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नागपूर येथे महिलांना त्रास देणाऱ्या गुंडाची जमावाकडून हत्या

एका गुंडाची नालंदा चौक परिसरातील्या वस्तीतील नागरिकांकडून हत्या केली.  

Updated: Aug 13, 2019, 03:57 PM IST
नागपूर येथे महिलांना त्रास देणाऱ्या गुंडाची जमावाकडून हत्या

नागपूर :  येथे एका गुंडाची नालंदा चौक परिसरातील्या वस्तीतील नागरिकांकडून हत्या केली. वस्तीतील नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, अमली पदार्थांचा नशा करून महिलांना त्रास देणे असे त्याचे प्रकार चालायचे. याचा अनेकांना त्रास होता. अखेर आज संतप्त नागरिकांनी त्याची हत्या केली.

आशिष देशपांडे असे या ३२ वर्षीय गुन्हेगाराने नाव आहे. नेहमीच शांतीनगरमधील नालंदा चौक वस्तीतून अरुंद गल्ल्यांतून वाईट पद्धतीने वाहन चालवायचा. सोमवारी रात्री त्याने पुन्हा असे वाहन चालवले. त्यामुळे येथील वस्तीतील महिला आणि गुंड आशिषमध्ये वाद सुरू झाला. मात्र, पोलिसांना बोलविल्यानंतर तो तेथून पळून गेला.

पोलीस गेल्यानंतर तो पुन्हा वस्तीत आला आणि चाकू हातात घेऊन महिलांच्या अंगावर धावला. यावेळी संतप्त जमावाने त्याला मारहाण केली. अखेरीस वस्तीतील तरुणांनी हातात मिळेल ते फेकत मारहाण केली. फरशी, विटा, लोखंडी रॉड घालून त्याची जवामाने हत्या केली.

नागपुरातील गेल्या दोन दिवसात  दुसरी घटना आहे. चिखल साफ करण्याच्या मुद्द्याववरून ११ ऑगस्टला कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत  एका सिक्युरिटी गार्डची हत्या झाली होती.