नागपुरात खळबळ! एकाच घरात पती-पत्नीसह मुलाचा मृतदेह आढळला

Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात शांतीनगर तुमान गावात घरात तीन मृतदेह आढळले आहेत. पती-पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळला आहे. 

अमर काणे | Updated: Mar 14, 2024, 04:02 PM IST
नागपुरात खळबळ! एकाच घरात पती-पत्नीसह मुलाचा मृतदेह आढळला title=
nagpur news Bodies of 3 family members found in house

Nagpur Crime News: नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमान गावातील एका घरात तिघांचे मृतदेह आढळले आहेत. एकाच घरात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एकाच परिवारातील पती-पत्नी आणि मुलगा असे तिघांचे मृतदेह आढळले आहेत. पती श्रीनिवास इळपुंगटी (वय 58 वर्षे),पत्नी पद्मालता इळपुंगटी (वय 54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय 29) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांचाही मृत्यू संशयास्पद असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा राईस मिलचा कौटुंबिक व्यवसाय आहे. या तिघांचाही मृत्यू कसा झाला आणि नेमकं काय घडलं याचा शोध पोलिस घेत आहेत. एकाच घरातील तिघांचे मृतदेह आढळल्याने त्यांनी आत्महत्या केली की घातपात आहे, हे अद्याप कळू शकले नाहीये. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शव विच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.

(सविस्तर वृत्त लवकरच)