Viral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच

Nagpur Tiger Video : एक वाघ असतो.... एक दिवस ना त्याला राग येतो आणि मग.... या अशा ओळी लहानपणी तुम्ही गोष्टींमधून ऐकल्या असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून तुम्हाला वाघाच्या रागाचा अंदाजही येईल.   

अमर काणे | Updated: May 26, 2023, 10:56 AM IST
Viral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच
Nagpur Tiger playnig in his teritorry amid heat wave watch video

Nagpur Tiger Viral Video : पट्टेदार वाघ. भारतामध्ये या प्राण्याचा वावर प्रत्यक्षात पाहायला मिळणाऱ्यांचे अनुभव वेळोवेळी तितकेच रंजक असल्यातं तुम्ही पाहिलं असेल. आम्ही अमुक ठिकाणी होतो, तिथं वाघ आला आणि त्याचा पाहूनच आम्ही गारद झालो, ही अशी प्रतिक्रिया अनेकजणच देताना दिसतात. शिकार हेरत दबक्या पावसांनी जात त्याच्यावर हल्ला करणारा हाच वाघ महाराष्ट्रात सध्या उन्हाच्या झळांनी हैराण झाला आहे. इतका, की या उकाड्यामुळं त्याच्या संतापाचाही पारा चढताना दिसत आहे. विश्वास बसत नाहीये? नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील व्हिडीओ पाहून तुम्हाला ही बाब लक्षात येईल. 

थेट लग्न मंडपात प्रवेश करून धुमाकूळ घालण्याचा इतिहास असलेला राजकुमार वाघाचं वास्तव्य सध्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आहे. तिथे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला राजकुमार वाघाचा स्वभाव मात्र आजही तितकाच बिनधास्त आणि निर्धास्त आहे, अगदी नावाप्रमाणं. आपल्या क्षेत्रात कोणतीही नवी गोष्ट दिसली तर स्वभावानुसार राजकुमार त्याची चाचपणी आणि पडताळणी आजही करतो. 

पाहा या राजकुमारानं नेमकं काय केलंय... 

विदर्भात नवतपामध्ये उष्णतेची तीव्रता सर्वाधिक असते, त्यामुळे उष्णतेच्या झळा कमी जाणवाव्यात यासाठी प्राण्यासाठी प्राणीसंग्रहालयामध्ये विशेष व्यवस्था करण्यात येते. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात या दोन गोष्टींबरोबर प्राण्यांकरता खास मिस्ट फॉगरही बसवण्यात प्रयत्न करण्यात येत आहे. पण, तिथे असलेल्या राजकुमार वाघाला त्याच्या परिक्षेत्रात लावलेली ही नवी गोष्ट पचनी पडली नाही आणि त्यानं पुढच्याच क्षणाला मिस्ट फॉगरची पूर्ण यंत्रणा पाइपसह उखडून काढली. त्यानंतर तो पुन्हा शेजारील पाण्यात डुंबून बसला. 

हेसुद्धा वाचा : शनिवार- रविवारी मुंबईत पाणीपुरवठा बंद; तुम्ही राहता त्या भागावरही होणार परिणाम, आताच पाहून घ्या 

लग्नसमारंभातही गेला होता राजकुमार 

राजकुमारचा आणखी एक किस्सा म्हणजे, मुक्त असताना त्यानं तुमसर परिसरात लग्न समारंभात जाऊन धुमाकूळ घातला होता. तिथं तो जसा रुबाबात वावरला होता तोच रुबाब इथंही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयातही आपल्या त्याच बिनधास्त वृत्तीचं दर्शन तो वारंवार देतो .