रुबाबदार राजकुमार वाघ आणि देखणी ली वाघिणचे होणार एकत्र दर्शन

 रुबाबदार, राजकुमार वाघ आणि देखण्या ली वाघिणीचं आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात (Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park) एकत्र दर्शन होणार आहे.  

Updated: Sep 9, 2021, 12:53 PM IST
रुबाबदार राजकुमार वाघ आणि देखणी ली वाघिणचे होणार एकत्र दर्शन

अमर काणे / नागपूर : रुबाबदार, राजकुमार वाघ आणि देखण्या ली वाघिणीचं आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात (Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park) एकत्र दर्शन होणार आहे. त्यामुळे आता गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना या दोन वाघांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. 

या वाघ-वाघिणीला पहिल्यांदा एकत्र एका एकाच एनक्लोजरमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांची एकमेकांबाबतची अनुरुपता पाहून त्यांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय उद्यानाच्या भारतीय सफारीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 26 जानेवारी 2021 रोजी केले होते. त्यावेळी राजकुमार वाघाला सोडण्यात आले होते. 

राजुकमार आणि ली एकत्र राहून सुसंगतपणे राहू शकतात का  याची खात्री पटल्यावरच गोरेवाडा प्रशासनाने हा निर्णय घेतला. सफारीसाठी त्यांना एकत्र सोडण्यापूर्वी त्यांना एकत्र पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. त्या दोघांची एकमेकांशी अनरुप वर्तवणूक दिसून आल्यानंतर त्यांना सफारीसाठी एकत्र सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोरेवाडाला सफारीला येणाऱ्या पर्यटकांना आता या दोन्ही वाघांना एकत्र पाहता येणार आहे

रुबाबदार राजुकमार

राजकुमार वाघ 2017 मध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात थेट लग्न मंडपात पोहचला होता. त्याने कुणावर हल्ला केला नसला तरी दहशत पसरली होती. त्यानंतर त्याला जेरबंद करून गोरेवाड्यातील वन्यजीव बचाव केंद्रात आणले होते. तीन वर्ष तिथे राहिल्यानंतर त्यालानंतर सफारीसाठी सोडण्यात आले. तर ली वाघिण महाराजबागेतून गोरेवाड्यात आण्यात आलेय.

जानेवारी 2009मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या जुनाना तलावाजवळ 25 दिवसांची तिन शावक आढळले होते. त्यांना ली, जान आणि चेरी असे या तीन बछड्यांची नाव ठेवण्यात आली आहेत. नागपुरातील महाराजबाग प्राणी संग्रहालयात बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफने ली वाघिणीला एक वर्षासाठी दत्तक घेतले होते.