नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना एक दुर्घटना

नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना एक दुर्घटना घडली आहे. 

Jaywant Patil Updated: Mar 31, 2018, 07:32 PM IST
नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना एक दुर्घटना title=

नागपूर : नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना एक दुर्घटना घडली आहे. मेट्रोचे काम सुरु असताना ब्रिजची लोखंडी फ्रेम कोसळल्याने एका कारचे मोठं नुकसान झालं आहे. नागपूरच्या सेंट्रल एव्हेन्यू दारोडकर चौकाजवळ ही दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास मेट्रोचं काम सुरु असताना या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज झी मीडियाच्या हाती लागलंय. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर जीएसएस फ्रेम कोसळताना दिसत आहे. 

क्रेनच्या मदतीने ही फ्रेम उचलताना दुर्घटना

पहाटेच्या सुमारास क्रेनच्या मदतीने ही फ्रेम उचलताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेप्रकरणी महामेट्रोकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत. तसंच याप्रकरणी निष्काळजीपणा करणा-या कर्मचा-यावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.