नाणार रिफायनरी प्रकल्प जमीन मोजणी तिसऱ्या दिवशी बंद

राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाची जमीन मोजणी तिसऱ्या दिवशीही बंद पाडलीय. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 24, 2017, 06:24 PM IST
नाणार रिफायनरी प्रकल्प जमीन मोजणी तिसऱ्या दिवशी बंद title=

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाची जमीन मोजणी तिसऱ्या दिवशीही बंद पाडलीय. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. 

तरीदेखील जिल्हा प्रशासन जबरदस्तीनं मोजणी करत असल्याचा आरोप इथले ग्रामस्थ करत आहेत. नाणारमधील पाळेकर वाडी, सागावेतील कात्रदेवी आणि दत्तवाडीतील मोजणी बंद केली आहे. काहीही झालं तरी प्रकल्पाची जमीन मोजणी करू देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत आम्हाला नको हीच मागणी सध्या इथले स्थानिक करत आहेत.  आमच्या जमिनी घेऊन आम्हाला वाऱ्यावर सोडून देऊ नका, असेही येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.