पुणे: आजपासून पुढील दहा दिवस महाराष्ट्रभर गणेश उत्सवाची धूम आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठी भाषेतून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषण देत होते. या संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काल सायंकाळी पंतप्रधानांचे भाषण झाले. यावेळी भाषणाच्या शेवटी त्यांनी देशभरातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अचानक नरेंद्र मोदींचे मराठीतून संवाद करणं उपस्थितांनाही आनंदून गेले.
गणपति बाप्पा मोरया! गणेश चतुर्थी के शुभ अवसर पर देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। Greetings on the auspicious occasion of Ganesh Chaturthi.
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2017
उत्कृष्ट वकृत्त्व शैली आणि सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून मोदी जनतेची मनं जिंकतात.आतापर्यंत मोदींनी देशातील अनेक महत्त्वाच्या सणांच्यावेळी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, गुरूवारी एका कार्यक्रमादरम्यान मोदींनी मराठी भाषेतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूश केले. भाषणासोबतच त्यांनी ट्विटरही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.