Nashik Boy drowns in well: मे महिन्याची सुट्टी सुरू झाली आहे. सुट्टीत घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांवर आता पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात घडलेल्या दोन घटनां वाचून पालकांनी सतर्क होण्याची गरज आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडीमध्ये एका साडेचार वर्षाच्या लहानग्याच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Boy drowns in well)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिशांत अजय गोवर्धने (वय 4 वर्ष 6 महीने) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. दिशांत हा मखमलाबाद रोड ,मधुबन कॉलनी पंचवटी नाशिक येथला रहिवाशी आहे. तो मोहाडी येथे आला होता.
परभणीः वाळू माफियांना पकडण्यासाठी नदीत उतरले, पोहताना दम लागला, तलाठी बुडाला
खेळता खेळता मोहाडी गावच्या स्मशानभुमी परिसरातील सार्वजनिक विहीरीजवळ तो गेला व विहीरीतील पाण्यात तो अनावधानाने पडला यात दिशांत याचा बुडुन मृत्यु झाला आहे. या घटनेने गोवर्धने कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. चिमुकल्या दिशांतचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी एकच हांबरडा फोडला. कुटुंबीयांचा आक्रोश पाहताच गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. निर्जन ठिकाणी असलेल्या विहिरींवर जाळी बसवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातही अशीच घटना घडली होती. आईसह कपडे धुण्यासाठी गेलेल्या १२ वर्षांच्या मुलाचा अंघोळ करताना नदीत बुडून मृत्यू झाला होता. दोन दिवसांतच आणखी एका बालकाचा अशाच पद्धतीने मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.
अज्ञात नंबरवरुन आलेला व्हिडिओ कॉल रिसिव्ह करताय?; या महिलेसोबत काय झालं पाहा...
परभणी येथेही अशीच एक घटना समोर आली आहे. वाळु माफियांचा पाठलाग करत असताना तलाठी नदीपात्रात बुडाला आहे. पलीकडच्या काठावर जाण्याचा प्रयत्न करत असताना तलाठी सुभाष होळ त्यांना पोहताना दम लागला असावा आणि ते पाण्यात बुडाले असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. दरम्यान, वाळू माफियांवर कारवाई करत असताना ही दुर्घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सांगलीत जेवण बनवण्यावरुन वाद, बायकोने नवऱ्यावर केले सपासप वार; जागीच मृत्यू