मैत्री केली मग झाकीर नाईकचे व्हिडीओ पाठवले, प्रेमाच्या बहाण्याने धर्म परिवर्तन करू पाहणाऱ्या चौघांना अटक

Crime News : कोपरगावमधील एका 20 वर्षीय युवतीस प्रेमाच्या जाळयात ओढून तिला जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावल्याचे समोर आले आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह अत्याचार देखील केल्याचे तरुणीने म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 13, 2023, 12:06 PM IST
मैत्री केली मग झाकीर नाईकचे व्हिडीओ पाठवले, प्रेमाच्या बहाण्याने धर्म परिवर्तन करू पाहणाऱ्या चौघांना अटक title=

कुणाल जमदाडे, झी मीडिया, नाशिक : मध्य प्रदेशातील (MP Crime) इंदूर येथील तरुणाने कोपरगाव शहरातील एका 20 वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुण पीडित युवतीचे फोटो व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल (Blackmail) देखील करत होता. खळबळजनक बाब म्हणजे तरुणाने पीडितेला इंदूर शहरात बोलावून तिला नमाज पठण करायला लावला आणि तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव देखील आणल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी (Kopargaon Police) याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे.

चौघांना अटक

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायम कुरेशी (रा. जुना पिठा, इंदौर, मध्य प्रदेश), इमरान अयुब शेख (रा. कोपरगाव), छोटू उर्फ कलिम (पूर्ण नाव माहीत नाही), फय्याज (पूर्ण नाव माहीत नाही दोघेही रा. कोपरगाव) व इंदौर येथील मौलवी पूर्ण नाव माहिती नाही, या पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील इमरान आयुब शेख आणि फैयाज याच्यासह चौघांना कोपरगाव पोलिसांनी अटक केली आहे. नगर जिल्ह्यात या घटना सर्वाधिक प्रमाणात होत असल्याने ग्रामीण पोलीस या संपूर्ण प्रकारांबाबत सतर्क झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी भरत दाते यांनी दिली आहे. 

मदरश्यात केले अत्याचार

प्रेमाच्या जाळ्यात ओढून मदरशात अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.अन्य एक आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना करण्यात आला आहे. अटक केलेल्या तरुणाने इंन्स्टाग्रामच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत तिच्याकडून बळजबरीने प्रार्थना म्हणून घेऊन धर्मांतर केल्याचा तरुणीचा आरोप आहे. कोपरगाव पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

"सुरुवातीला आम्ही इन्स्टाग्रामवर भेटलो होतो. एक ते दीड वर्षे आमच्यात फक्त मैत्री होती. त्यानंतर आम्ही जवळ आलो. आम्ही त्यावेळी ऑनलाईन रिलेशनशिपमध्ये होतो. एकदा मी माझ्या परिवारासोबत फिरून येत असताना इंदूर येथे थांबलो होतो. त्यावेळी आमच्या एका मित्राने त्याच्या मित्रासह भेटायची योजना आखली. भेटल्यानंतर आम्ही थोडावेळ एकत्र घालवला आणि त्यानंतर आम्ही गावी परतलो. त्यानंतर त्याने मला सांगितले की इस्लाम एकदा समजून घे. सुरुवातीला त्याने मला झाकीर नाईकचे व्हिडीओ पाठवले. त्यानंतर तो रोज नवीन नवीन व्हिडीओ पाठवून लागला. त्यानंतर त्याने मला इस्लाम धर्म स्विकारायला लावला पण मी ऐकले नाही. त्याने पाकिस्तान भारतातल्या मौलानांचे व्हिडीओ पाठवले आणि त्यानंतर माझे मन इतके बदललं की मला इस्लामच सर्वात योग्य आहे असं वाटू लागलं," असे पीडित मुलीने सांगितले.

"त्यानंतर त्यालाही वाटू लागले की माझे परिवर्तन झालं आहे. माझ्या मैत्रिणीचा साखरपुडा असल्याने मी इंदुरला गेले. तिथे गेल्यावर त्याने मला कलमा पडायला लावला. त्यानंतर त्याने तूने इस्लाम धर्म स्विकारला आहेस असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने माझ नावही बदललं. त्यानंतर तिथे आमचा निकाह लावून देण्यात आला. त्यानंतर मला गाजराचा हलवा खाऊ घातला. त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर त्याने मी तिथे येणार असल्याचे त्याने सांगितले. गावाला आल्यानंतर त्याने बसस्टॉपवर बोलवले आणि मदरश्यात नेण्याचा प्रयत्न केला. मी विरोध केल्यावर त्यांनी जबरदस्तीने मला तिथे नेले आणि माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी मला घरी सोडले. या सर्व प्रकारानंतर त्यांचा पुन्हा फोन आला आणि एका ठिकाणी जायचे आहे असे त्याने सांगितले. मी नकार दिल्यावर तुझे व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे असे त्याने सांगितले आणि ब्लॅकमेक करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने मी तिथे गेले. त्यांनी कारमध्ये बसवून मला त्यांनी समृद्धी महामार्गावर नेले. त्यावेळी तुझ्या गावातील आणखी काही मुलींनाही असे करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्याने आपल्याला इस्लामचा प्रसार करायचा आहे असे सांगितले. याबाबत मी माझ्या घरच्यांना सांगितले," असे पीडितेने सांगितले.