नाशिक : गंगापूर धरणातून थेट नाशिकरोड आणि गांधीनगरला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी काल गंगापूर गावानजीकच्या कानेटकर उद्यानाजवळ फुटली. काल दुपारी १२ ते १ च्या दरम्यानची घटना आहे. एका अज्ञात जेसीबी चालकामुळे ही जलवाहिनी फुटली त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे शहरातील पंचवटीसह काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मुख्य जलवाहिनी असल्यामुळे सुमारे ५० फुटांहून उंच पाण्याचा फवारा उडून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. महापालिकेला याची माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी तत्काळ मुख्य पाण्याचा विसर्ग थांबवून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तब्बल तीन तासानंतर हे काम पूर्ण झाले. तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले.
मुख्य जलवाहिनी फुटल्याची माहिती नाशिक महापालिकेला याची माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी तत्काळ मुख्य पाण्याचा विसर्ग थांबवून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सुला वाइन आणि कानेटकर उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पाटामधून गेलेल्या एक मीटर व्यासाच्या मुख्य लाइनमधील व्हॉल्व्ह शनिवारी सकाळी अज्ञात जेसीबीचालकाने तोडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती आहे.
या ठिकाणी परिसरात बांधकामाचे काम करण्यासाठी आलेल्या जेसीबीच्या चालकाने मुद्दामहून या मुख्य जलवाहिनीला जेसीबीच्या धडकेने व्हॉल्व्ह तोडला. त्यानंतर तत्काळ त्याने तेथून पळ काढला. मुख्य जलवाहिनी असल्याकारणाने उंच पाण्याचा फवारा उडू लागल्याचे पाहून नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते.
दरम्यान, तीन तासात व्हॉल दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. जवळपास ४५ मिनिटं पाणी व्हॉल पाण्याचा भव्य फवारा सुरु होता. मुख्य पाईपलाईन असल्यानं पाण्याचा प्रेशर जास्त होता. त्यानंतरही अंतिम काम म्हणजे जवळपास तीन तासानंतर पूर्ण झाले. या घटनेचा अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला. मात्र, पंचनाम्यात काहीही समोर आले नाही. मात्र, अद्याप कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही.