Sharad Pawar on PM Narendra Modi: शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उपस्थित केला होता. यानंतर राजकीय वर्तुळातून उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. कधीकाळी शरद पवार यांचे तोंड भरुन कौतुक करणारे पंतप्रधान शरद पवारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले. दरम्यान शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधानांना उत्तर दिले.
पंतप्रधान मोदींनी कृषी खाते कारभार यावर काही मुद्दे मांडले. पंतप्रधान हे पद हे इन्स्टिट्यूट आहे. त्या पदाचा मान राखत भूमिका मांडत असल्याचे पवारांनी सुरुवातीला स्पष्ट केले.
2004 कृषी मंत्री पद होते त्यावेळेस अन्न धान्य टंचाई होती, त्यावेळेस कटु निर्णय घ्यावा लागला ,अमेरिकातून गहू आयात बंद केली होती. याची आठवण पवारांनी करुन दिली. हमीभाव दर वाढवले. गहू तांदूळ यासह अनेकांचे हमीभाव दुप्पट वाढ केल्याचे पवार म्हणाले.भारताचे जगात सर्वाधिक तांदूळ उत्पादन जास्त झाले तसेच ऊस गहू उत्पादन यात मोठे उत्पादन वाढ झाल्याचे पवारांनी सांगितले. देश एकेकाळी आयात करणारे उत्पादन निर्यात करू लागलो. देशांची प्रगती झाली. क्रांतिकारक निर्णय शेती 62 हजार कोटी कर्जमाफी केल्याचे पवार यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी आरोप केले. त्यांना कृषीमंत्री असताना मी काय काम केले हे सांगायचे होते. दरम्यान पंतप्रधानांवर टीका टिपण्णी करणार नाही, असेही ते म्हणाले.
आता गेल्या काही काळात कांदा टोमॅटो रस्त्यावर फेकला गेला. यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी असेही पवार म्हणाले. तसेच मोदींच्या कार्याकाळात साखर निर्यात बंदी घातली त्याचा परिणाम भोगावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधाांना देशात काय घडते त्यांना वास्तव ब्रेफींग दिले जात नाही, जे वास्तवावर अधारित नाही. देशात लोकांना बदल हवाय, मोदी विचारांची संख्या राज्य, देशात कमी आहे. बहुसंख्य राज्यात भाजपा सत्ता नाही. हे चित्र पुढे काय होणार आहे? त्याचा धसका कोणी घेतला यामुळ आरोप होतो का? असे प्रश्न पवारांनी यावेळी उपस्थित केले.