सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना पूर्णपणे क्लीनचीट

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी पूर्णपणे क्लीनचीट देण्यात आली आहे.

Updated: Dec 20, 2019, 01:22 PM IST
सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना पूर्णपणे क्लीनचीट title=

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी पूर्णपणे क्लीनचीट देण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. सध्या महाविकास आघाडीचं धोरण अजित पवारांना वाचवण्याच्या दृष्टीने पाहायला मिळतं आहे. अजित पवारांविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची राजकीय वाट सुखर होणार आहे. 

काय आहे आरोप ? 

सिंचन प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी मिळण्यापूर्वी निविदा मागवण्यात आल्या तसेच कंत्राट देताना निर्धारित प्रक्रियेचे उल्लंघन करण्यात आल्याचे आरोप अजित पवारांवर ठेवण्यात आले.  अपात्र कंत्राटदार आणि संयुक्त उपक्रम कंपन्यांना निविदा जारी करण्यात आल्या, अनेक कंत्राटदारांनी बोगस प्रमाणपत्रे दाखल केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. प्रकल्पांचा निधी वाढवण्यात आला तसंच दर्जाहीन कामं करण्यात आली, असे गंभीर आरोप अजित पवारांवर करण्यात आलेत