शिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर

साईबाबा म्हटलं की आपल्या डोळासमोर येते ती शिर्डी साई नगरी...पण तुम्हाला माहितीय का, भारतातील पहिलं साई मंदिर कुठे आहे ते? निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर साई मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं. 

नेहा चौधरी | Updated: Jul 10, 2024, 04:59 PM IST
शिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर  title=
Not Shirdi but the first Sai temple in India is in Sindhushirdi Kavilgav Kudal village Konkan

शिर्डी तीर्थक्षेत्र म्हणजे साईभक्तांसाठी ब्रम्हनगरी मानलं जातं. गुरुपौर्णिमेला (Guru Purnima 2024) शिर्डीत भक्तांची मोठ्या संख्येत गर्दी होते. महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे मंदिर साई बाबांची समाधी मंदिर आहे. पण तुम्हाला भारतातील पहिलं साई मंदिर माहितीय का? अगदी साई भक्तदेखील या प्रश्नाच उत्तर देताना चुक करतील. आज आम्ही या मंदिराबद्दल सांगणार आहे. हे मंदिर आहे कोकणातील सिंधुदुर्गातील कुडाळ गावात. कविलगांवची साई नगरी ही सिंधुदुर्गातील शिर्डी मानली जाते. 

निसर्गाच्या सान्निध्यात वसलंय साईबाबांच मंदिर!

कुडाळ रेल्वे स्थानकापासून अर्ध्या कि.मी. आणि बस स्थानकापासून 4 कि.मी. वर साईबाबांचं मंदिर आहे. या मंदिराला भारतातील पहिलं साई मंदिर म्हणून ख्याती मिळालीय. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की. कविलगांव गावात रामचंद्र रावजी उर्फ दादा मांड्ये हे श्री दत्त महाराजांचे असिम भक्त आणि त्यांच्या कठोर भक्तीचं फळ त्यांना एके दिवशी मिळालं. त्यांना स्वप्नात प्रत्यक्ष दत्त महाराजांनी साक्षात्कार घडवला आणि ते म्हणाले की, 'तू शिर्डीला ये'.

हे स्वप्न पाहिल्यानंतर ते शिर्डीला गेले आणि त्यांची साईबाबांची भेट घडवून आली. तेव्हाच त्यांना साई स्वरुपात दत्ताचं प्रत्यक्ष दर्शन घडलं. काही वर्षात म्हणजे सन 1918 साली शिर्डीमध्ये बाबांनी आपला पवित्र देह ठेवला आणि त्यानंतर लगंच दुसर्‍या वर्षी म्हणजे सन 1919 मध्ये कविलगांव या गावात बाबांच्या अद‍्भूत भक्तीप्रेरणेने प्रेरीत झालेल्या मांड्ये यांनी बाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव साजरा केला. तेव्हापासून बाबांच्या पुण्यतिथी उत्सवास कविलगांवात सुरुवात झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyal Naik (@priyalrn)

आज आपण कविलगांवचे भव्य साईमंदिर पाहतो ते त्या काळी एक लहानशी गवताची झोपडी होती. या मंदिरातील साईची प्रमुख मूर्ती 6 फूट उंचीची आहे. त्याप्रमाणे या मंदिरात अनेक साधूसंतांच्या देवदेवतांच्या दत्त महाराजांच्या मूर्त्या आहेत. शिवाय वेगळे असे दत्त मंदिरही आहे. मूर्तीची चैतन्यता भक्तांस मंदिरात खिळवून ठेवणारी आहे. असे हे साई मंदिर कविल गावासाठी शिरोभूषण आहे. म्हणूनच कविलगांव हे कोकणची शिर्डी समजली जाते. साईबाबा मंदिराच्या बाजूलाच रामचंद्र उर्फ दादा मांड्ये यांची घुमटी मध्ये आसनस्थ मूर्ती तुम्हाला पाहिला मिळते.