मुंबई: राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने जाहीरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे 'शिवशाही थाळी'ची योजना सुरु केली होती. काही दिवसांपूर्वीच महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यभरात या उपक्रमाचा शुभारंभ केला होता. या उपक्रमातंर्गत राज्यातील गरीब आणि कष्टकऱ्यांना अवघ्या १० रुपयांत जेवणाची थाळी मिळणार आहे. शिवसेनेची ही थाळी चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती.
यानंतर आता भाजपकडूनही त्याला प्रत्युत्तर म्हणून दीनदयाळ थाळी सुरू केली आहे. पंढरपुरातून या योजनेचा शुभारंभ झाला. त्यानुसार आता ३० रुपयांत लोकांना भरपेट जेवण मिळणार आहे. दुपारी १२ ते १ या एक तासाच्या वेळेतच ही थाळी सर्वांना दिली जात आहे.
आधार कार्ड असेल तरच १० रुपयांत जेवण मिळणार
दीनदयाळ ३ चपाती, १ भाताची मुद , १ वाटी भाजी, १ वाटी आमटी, १ वाटी ताक, लिंबू फोड, शेंग चटणी, लोणचे, पापड असे १० पदार्थ देण्यात येत आहेत. तर शिवशाही थाळीत दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात आणि एक वाटी डाळ दिली जाते. त्यामुळे आता भाजपची 'दीनदयाळ थाळी' सेनेच्या 'शिवशाही थाळी'वर भारी पडण्याची शक्यता आहे.
१० रुपयांच्या शिवथाळीसोबत १५ रुपयांची पाण्याची बाटली, आव्हाड ट्रोल
पंढरपुरात मंगळवारपासून दीनदयाळ थाळी योजनेचा शुभारंभ झाला. सध्या ही योजना पंढरपूरातच सुरु आहे. विशेष म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक या थाळीचा लाभ घेत असून तासाभरात सुमारे ५०० भाविक या थाळीचा लाभ घेतील. लवकरच राज्यभरात दीनदयाळ थाळी सुरु करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी दिली.