मनमाड : दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टी नंतर आज कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं बघयाला मिळालं.
जिल्ह्यातील सर्वच बाजार समितिमध्ये आज उन्हाळ व नव्याने बाजारात आलेल्या लाल कांद्याला चांगला भाव मिळाला. मनमाड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 3100 तर सरासरी 2500 रूपये दर भेटला.
सध्या नविन लाल कांदा बाजारात विक्रीला येतोय. मनमाडमध्ये याच लाल कांद्याला जास्ती जास्त 2500 तर सरासरी 1850 रूपयांचा दर मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरासरी दरात अडीचशे रुपयांची वाढ झाली.