पंकजा मुंडेंची अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर टीका

 धनंजय मुंडेंवर चौफेर टीका

Updated: Aug 30, 2019, 03:08 PM IST
पंकजा मुंडेंची अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर टीका

बीड | ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. धरणात लघुशंका करण्याची भाषा करणारे काय विकास करणार? जे परळीच्या नाल्याची स्वच्छता करू शकले नाहीत ते कसा काय विकास करणार? परळी येथे आयोजित वैद्यनाथ देवल समितीच्या कार्यक्रमात त्यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. 

परळीचे नागरिक हुशार आहेत, ते स्थानिक स्थरावरील निवडणुकीत स्थानिक नेत्याला पकडतात, तर केंद्रीय स्तरावरील निवडणुकीत मोठ्या नेत्यांना साथ देतात असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर चौफेर टीका केली आहे.