शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडे यांनी अशी दिली प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर...

Updated: Oct 23, 2020, 04:10 PM IST
शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडे यांनी अशी दिली प्रतिक्रिया  title=
संग्रहित छाया

जालना : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही शिवसेनेच्या नेत्याने ऑफर दिली. या ऑफरवर पंकजा मुंडे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याआधी त्यांनी खडसे यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तथा नाथाभाऊंच्या जाण्याने वेदना मला प्रचंड वेदना झाल्या असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. खडसे यांच्या पक्षातून जाण्याने खेद वाटतो असंही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे या जालना जिल्ह्यातील वडी गोद्री भागात आल्या होत्या तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. 

एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिट्ठी देण्याची घोषणा केल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. या ऑफर बद्दल विचारले असता शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल खोतकर यांचे आभार मानले आहेत.

खडसे हे पक्षातून गेल्यानंतर आता ओबीसींची जबाबदारी तुमच्याकडे आलीय असा प्रश्न विचारला असता पीडित, वंचितांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मी राजकारणात असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

6\