कल्याणचा पत्रीपूल पाडण्यास स्थगिती

गणेशोत्सवानंतर हा पूल पाडण्यात येणार आहे. दरम्यान तोवर या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक होऊ शकते 

Updated: Aug 26, 2018, 10:50 AM IST
कल्याणचा पत्रीपूल पाडण्यास स्थगिती title=

कल्याण: कल्याणचा पत्रीपूल पाडण्यास स्थगिती देण्यात आलीय. २५ सप्टेंबरनंतर म्हणजेच गणेशोत्सवानंतर हा पूल पाडण्यात येणार आहे. दरम्यान तोवर या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक होऊ शकते का याची चाचपणी कऱण्यात येणार आहे.

कल्याण शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी

मुंबई आयआयटी आणि व्हीजेटीआय यांच्यामार्फत या पुलाची पुन्हा चाचणी घेण्यात येईल. एकीकडे मुंब्रा बायपासचं काम सुरू असल्यामुळे नवी मुंबई आणि पुण्याकडून भिवंडी, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीचा भार कल्याण शहरावर पडला आहे. त्यातच पत्री पूल बंद केल्यापासून कल्याण शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊ लागलीये.

वाहतूक कोंडीमध्ये भर

आज सुट्टी असल्याने पत्री पूलाजवळ असलेल्या मेट्रो मॉलला खरेदीसाठी येणाऱ्याची संख्या जास्त असते. त्यामुळे या वाहनांची वाहतूक कोंडीमध्ये भर पड़त आहे.