शेतकरी नेते राजू शेट्टी यांची या नेत्याविरूद्ध निवडणूक लढवण्याची इच्छा

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राजू शेट्टींनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Sep 19, 2019, 11:39 PM IST
शेतकरी नेते राजू शेट्टी यांची या नेत्याविरूद्ध निवडणूक लढवण्याची इच्छा title=

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राजू शेट्टींनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. राजू शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. त्यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिलेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणुकीला उभे राहिल्यास ते ज्या मतदारसंघातून लढतील त्या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचंही राजू शेट्टींनी सांगितलंय. चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार नसतील तर शिरोळमधूनच लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटेनकडून हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढले होते. मात्र भाजपच्या धैर्यशील माने यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. यानंतर आता राजू शेट्टी हे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

सदाभाऊ खोत हे त्यांचे जवळचे साथीदार होते, मात्र युतीनंतर सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्यात वाद झाल्यानंतर सदाभाऊ यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडली. राजू शेड्डी यांनी सध्या सदाभाऊ खोत यांच्यावर कडकनाथ कोंबड्यांप्रकरणी टीकेची तोफ डागली आहे.