पीएमसी घोटाळा : राकेशकुमार आणि सारंग वाधवान यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त

पंजाब आणि महाराष्‍ट्र बँकेच्‍या गैरव्‍यवहार प्रकरणी कोट्यवधी रुपयांच्या  अलिबागमधील मालमत्‍तेवर अंमलबजावणी संचालनालयाने टाच आणली आहे. 

Updated: Oct 9, 2019, 12:20 PM IST
पीएमसी घोटाळा : राकेशकुमार आणि सारंग वाधवान यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त title=

अलिबाग : पंजाब आणि महाराष्‍ट्र बँकेच्‍या गैरव्‍यवहार प्रकरणी राकेशकुमार आणि सारंग वाधवान यांच्‍या अलिबाग तालुक्‍यातील आवास सासवणे इथल्या मालमत्‍तेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. समुद्र किनारी असलेल्‍या अलिशान फार्महाऊसमधील सर्व खोल्‍या, त्यातल्या इतर वस्‍तू जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत. 

२२ खोल्यांच्या करोडो रुपयांच्या बंगल्यावर ईडीचा छापा

 

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तू येथून हलवण्‍यात आलेल्या नाहीत. ही मालमत्‍ता जप्‍त केल्‍यानंतर तिचा लिलाव करण्यात येणार आहे. हा बंगला सीआरझेड कायद्याचे उल्‍लंघन करून बांधण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे नीरव मोदीच्‍या बंगल्‍याप्रमाणेच हा बंगलादेखील महसूल विभागाच्‍या रडारवर आहे.

दोन दिवसांपूर्वीच पीएमसी प्रकणात  ईडीने अलिबाग येथे छापा टाकला होता. करोडो रुपयांच्या  अलिशान बंगल्यात अनेक वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच बंगल्याच्या आवारात कार आणि अन्य गाड्या आढळून आल्या होत्या. यापैकी एक कार कर्नाटकमधील असून दोन कार या पेण, रायगड आणि ठाणे येथील आरटीओ कार्यालयात पासिंग केलेल्या आहेत. तसेच ईडीच्या छाप्यात मालदीवमध्ये एक याट आणि एअरक्राफ्टही आढळून आले आहे.