गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड चालवायचे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, OLX वर तरुणींची फसवणूक

वसईमध्ये किंडर अ‍ॅपवरून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला अनैतिक मानवी वाहतूक  शाखेने अटक केली आहे. वसई शहरात सुरू असलेल्या या  हाय प्रोफाईल रॅकेटमधील 4 पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे.

Updated: Apr 10, 2021, 08:40 AM IST
गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड चालवायचे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, OLX वर तरुणींची फसवणूक
representative image

वसई : वसईमध्ये किंडर अ‍ॅपवरून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला अनैतिक मानवी वाहतूक  शाखेने अटक केली आहे. वसई शहरात सुरू असलेल्या या  हाय प्रोफाईल रॅकेटमधील 4 पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे.

 एकीककडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दूसरीकडे अनैतिक व्यवसाय कमी व्हायचे नाव घेत नाहीये. वसई शहरात एक तरुण आणि तरुणी हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 
 
 वसई पश्चिमेकडील नवघर माणिकपूर एसटी बस डेपो जवळ एक महिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुलीना घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.  त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना अटक केली. 
 
 सेक्स रॅकेट चालवणारे आरोपी जिया जावेदकर आणि संदीप पाल हे दोन्ही प्रियकर आहेत. संदीप OLX वर नोकरी शोधणाऱ्या सुशिक्षित मुलींना पर्सनल सेक्रेटरीची नोकरी देण्याचे सांगून,  त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता.
 
 याप्रकरणी वसई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने दोघांना अटक केली आहे.