औरंगाबादमध्ये मिरवणुकींवर ड्रोनची नजर

१० दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देणार आहेत. औरंगाबाद पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत. यावेळी विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचं लक्ष आकाशातूनही असणार आहे.

Updated: Sep 5, 2017, 10:52 AM IST
औरंगाबादमध्ये मिरवणुकींवर ड्रोनची नजर title=

औरंगाबाद : १० दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देणार आहेत. औरंगाबाद पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत. यावेळी विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचं लक्ष आकाशातूनही असणार आहे.

चार स्पेशल ड्रोन कॅमेरे मिरवणूक आणि विसर्जन करण्याच्या ठिकाणी तैनात असणार आहेत. हे कॅमेरे प्रसंगी मिरची पावडर सुद्धा आकाशातून टाकू शकणार आहेत. सोबतच पोलिसांचा फौजफाटाही मोठ्या प्रमाणात असणार आहे.

राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. पोलिसांनी राज्यभरात चोख व्यवस्था केली आहे. नागरिकांनी देखील सुरक्षेसाठी पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे.