मुंबई : Private schools fees : शालेय शुल्कवाढीबाबतची मोठी बातमी. शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक कार्यकारी समितीची मान्यता न घेता खासगी शाळांची फी वाढ केलेली असल्यास त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे.
शुल्कवाढ करणाऱ्या शाळांविरोधात पालकांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी. तक्रार केल्यानंतर शुल्क अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात शैक्षणिक वर्षाची सुरूवात होताच खासगी शाळा व्यवस्थापनाने 20 ते 35 टक्के शुल्कवाढ केली आहे. शालेय विभागाने त्याची दखल घेतली असून, शाळांनी फी वाढवल्यास कारवाई होणार आहेत. तसे संकेत देण्यात आले आहे.