close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुण्याच्या ७ नगरसेवकांचं पद रद्द

पुण्याच्या ७ नगरसेवकांचं पद रद्द झालं आहे. 

Updated: Sep 10, 2018, 08:42 PM IST
पुण्याच्या ७ नगरसेवकांचं पद रद्द

पुणे : पुण्याच्या ७ नगरसेवकांचं पद रद्द झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही कारवाई केली आहे. सौरभ राव यांनी पद रद्द केल्याचा अहवाल नगरविकास विभागाला कळवला आहे. सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे या नगरसेवकांवर ही कारवाई करण्यात आलीये. या ७ नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक हे भाजपचे आहेत. तर १ नगरसेवक राष्ट्रवादीचे तर १ नगरसेवक राष्ट्रवादी संलग्न आहेत.

किरण जठार, फरझाना मेहबूब शेख, आरती सचिन कोंढरे, कविता भारत वैरागे आणि वर्षा भीमा साठे हे ५ भाजपचे नगरसेवक आहेत. तर किशोर उर्फ बाळाभाऊ उत्तम धनकवडे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. आणि इनामदार रुक्साना शमसुद्दीन अपक्ष तरी राष्ट्रवादीशी संलग्न आहेत.