मी मल्ल्यासारखा पळून गेलो नाही, सगळ्यांचे पैसे देणार - डीएसके

फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केलेले पुणे शहरातील प्रसिद्ध बिल्डर डीएसकेनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Updated: Nov 21, 2017, 02:29 PM IST
मी मल्ल्यासारखा पळून गेलो नाही, सगळ्यांचे पैसे देणार - डीएसके title=

पुणे : फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केलेले पुणे शहरातील प्रसिद्ध बिल्डर डीएसकेनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘आमची परिस्थिती सुधारत आहे. आम्ही सकारात्मक दिशेनं प्रवास करत आहोत आणि आम्ही सगळ्यांचे पैसे देणार आहोत’, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

ते म्हणाले की, ‘डीएसकेनी कुणाला फसवले नाही. मल्यासारखा पळून गेलो नाही. दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर तसेच इतर मीडियावर माझ्या विरोधात आरोप झाले. मात्र त्यांना उत्तर देण्यापेक्षा परिस्थितीवर मार्ग शोधण्याला आम्ही प्राधान्य दिलं. डीएसके ड्रीम सिटीमुळे कंपनी अडचणीत आली असं म्हणण्यात अर्थ नाही. उलट ड्रीम सिटीचं आज आमच्यासाठी तारणहार ठरत आहे. इस्त्राईलच्या कंपनीसोबत एसईझेड उभारण्याचा करार झाला होता. मात्र त्या कंपनीनं माघार घेतली आणि तिथपासून आमच्या अडचणीला सुरवात झाली’.

डीएसकेनी सांगितले की, ‘पुढे डायमंड एसईझेड च्या ऐवजी ड्रीम सिटी उभारण्याचं ठरवलं. प्रकल्प आकाराला येत असतानाच बांधकाम क्षेत्रावर मंदी आली. त्यात दरम्यान माझा अपघात झाला. डीएसकेचे निधन झाल्याची अफवा पसरली. गुंतवणूकदार हवालदिल झाले. त्यांनी पैसे काढून घेण्याचा तगादा लावला. अडचण वाढत गेली. त्यानंतर नोटाबंदी आली. परिस्थिती आणखीनच बिघडली. केवळ गुंतवणूकदारांच्या हितासाठी आम्ही डीएसके टोयोटा बंद केली’.

‘आम्ही अजूनही पैसे देणे थांबवलेलं नाही. परिस्थितीला तोंड देत आहोत. गेल्या काही दिवसात ३० कोटी चुकते केलेत. सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांतून आम्हाला २ हजार कोटी मिळणार आहे. आम्हाला लोक मदत करत आहेत. त्यातून सगळ्यांचे पैसे देणार आहोत’, असे ते म्हणाले.